TRENDING:

Health Tips: हिवाळ्यामध्ये अति गरम पाण्याने अंघोळ करताय, तर सावधान! बेतू शकतं जीवावर

Last Updated:

अति जास्त गरम पाण्याने आंघोळ करणे आपल्या जीवावर बेतू शकते. अति जास्त प्रमाणात गरम पाण्याने आंघोळ केल्यामुळे आपल्याला चक्कर येऊ शकते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
advertisement

सध्या अतिशय थंडीचे दिवस सुरू आहेत. या दिवसांमध्ये आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. आरोग्याची काळजी घेत असताना आपला आहार हा पोषणयुक्त असला पाहिजे. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात ऊर्जा निर्मिती मोठ्या प्रमाणावर करणे गरजेचे असतं. कारण आपलं शरीर स्वतःचं तापमान संतुलित ठेवत असतं. शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी आणि ऊर्जा निर्मिती करण्यासाठी आपल्याला पोषणयुक्त आहाराची गरज असते. त्याचबरोबर हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला जास्त भूक लागते. त्यामुळे आपण प्रोटीनयुक्त आणि सकस आहार घ्यावा.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हे गाव लई न्यारं! ज्ञानोबा ते शिवबा, गावानं जपलाय ऐतिहासिक वारसा, तुम्ही पाहिलं का? Video
सर्व पहा

यासोबतच आपल्या शरीरामध्ये तापमान नियंत्रणाची जी क्रिया आहे, ती मेंदू मार्फत होत असते. या दिवसांमध्ये अतिशय थंड किंवा अतिशय गरम पदार्थांचे सेवन यामुळेच आपण टाळलं पाहिजे. त्याचबरोबर अतिशय उष्ण किंवा अतिशय थंड पाण्याने आंघोळ करणे देखील टाळलं पाहिजे. अचानक उष्ण पाणी आपल्या डोक्यावर पडल्यानंतर एखाद वेळी आपल्याला सिंक कोप सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास चक्कर येऊ शकते. अतिशय थंड पाणी किंवा अतिशय गरम पाण्याने आंघोळ केल्यास किंवा अतिशय थंड व गरम हवेने देखील आपल्याला चक्कर येऊ शकते. त्यामुळे सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे डॉक्टर बळीराम बागल यांनी सांगितलं.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Tips: हिवाळ्यामध्ये अति गरम पाण्याने अंघोळ करताय, तर सावधान! बेतू शकतं जीवावर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल