TRENDING:

Waffle Recipe : घरच्या घरी या एका ट्रिकने बनवा परफेक्ट कुरकुरीत वॉफल्स, नक्की ट्राय करा सोपी रेसिपी

Last Updated:

Bakery Style Waffle : वॉफल्स दिसायला फॅन्सी असले तरी ते घरी बनवणे सोपे असते. अनेकांना वाटते की, वॉफल्स बनवणे अवघड आहे किंवा त्यासाठी खास साहित्य लागते, पण तसे अजिबात नाही. योग्य पद्धत वापरली तर तुम्ही अगदी बेकरी स्टाइल वॉफल्स घरी तयार करू शकता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात रोज सकाळी हा प्रश्न असतोच की मुलांना नाश्त्याला काय द्यावे जे चविष्टही असेल आणि पटकन तयारही होईल. रोज रोज पराठे, पोहे किंवा ब्रेड खाऊन मुलंही कंटाळतात आणि पालकांनाही काहीतरी नवीन ट्राय करायचे असते. अशा वेळी जर तुम्हाला मुलांना गोड, कुरकुरीत आणि बेकरीसारखा ट्रीट द्यायचा असेल, तर वॉफल्स हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
बेकरी स्टाईल वॅफल रेसिपी
बेकरी स्टाईल वॅफल रेसिपी
advertisement

वॉफल्स दिसायला फॅन्सी असले तरी ते घरी बनवणे सोपे असते. अनेकांना वाटते की, वॉफल्स बनवणे अवघड आहे किंवा त्यासाठी खास साहित्य लागते, पण तसे अजिबात नाही. योग्य पद्धत वापरली तर तुम्ही अगदी बेकरी स्टाइल वॉफल्स घरी तयार करू शकता. मुलांना गोड खाण्याची इच्छा असो किंवा वीकेंडला काही स्पेशल बनवायचे असो, वॉफल्स प्रत्येक प्रसंगासाठी परफेक्ट असतात. तुम्ही ते चॉकलेट, न्यूटेला, मध किंवा आईस्क्रीमसोबत सर्व्ह करू शकता.

advertisement

खास बाब म्हणजे घरचे बनवलेले वॉफल्स स्वच्छ असतात आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते हेल्दीही बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया बेकरी स्टाइल वॉफल्स बनवण्याची सोपी रेसिपी.

वॉफल्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य

मैदा - 2 कप

दूध - 2 कप

अंडी - 2

रिफाइंड तेल - 1 कप

पिठीसाखर - 1 चमचा

advertisement

बेकिंग पावडर - 3 चमचे

मीठ - अर्धा चमचा

व्हॅनिला एसेंस - अर्धा चमचा

चॉकलेट किंवा आवडीचा कोणताही एसेंस

वॉफल्स बनवण्याची सोपी पद्धत

वॉफल्स बनवण्यासाठी सर्वप्रथम एक मोठे भांडे घ्या आणि त्यात अंडी चांगली फेटून घ्या, जेणेकरून ती हलकी आणि फेसाळ होतील. त्यानंतर त्याच भांड्यात मैदा, दूध, रिफाइंड तेल आणि पिठीसाखर घाला. आता त्यात बेकिंग पावडर, मीठ आणि व्हॅनिला किंवा चॉकलेट एसेंस मिसळा.

advertisement

सर्व साहित्य हळूहळू मिसळत गुळगुळीत पीठ तयार करा. पीठात गाठी राहणार नाहीत याची काळजी घ्या. पीठ खूप घट्ट वाटत असेल, तर थोडे दूध आणखी घालू शकता.

आता वॉफल मेकर ऑन करून तो चांगला गरम होऊ द्या. प्लेट्सवर थोडेसे बटर किंवा तेल लावा, जेणेकरून वॉफल्स चिकटणार नाहीत. त्यानंतर तयार केलेले पीठ वॉफल मेकरमध्ये घाला आणि झाकण बंद करा.

advertisement

वॉफल्स हलके सोनेरी रंगाचे होईपर्यंत शेकून घ्या. वॉफल्स कुरकुरीत आणि सुगंधी झाले की, बाहेर काढा. गरमागरम वॉफल्स तुम्ही चॉकलेट सॉस, न्यूटेला, मध, फळे किंवा आईस्क्रीमसोबत सर्व्ह करू शकता. हे नाश्त्यासाठी तसेच संध्याकाळच्या स्नॅक्ससाठीही खूपच छान लागतात.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनचे दर वाढले, कापूस आणि कांद्याला आज काय मिळाला भाव? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Waffle Recipe : घरच्या घरी या एका ट्रिकने बनवा परफेक्ट कुरकुरीत वॉफल्स, नक्की ट्राय करा सोपी रेसिपी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल