TRENDING:

मसूर डाळ आरोग्यासाठीच नाही तर सौंदर्य खुलवण्यासाठीही उपयुक्त, असा करा उपयोग, Video

Last Updated:

आरोग्यास लाभदायी मसूर डाळ रोजच्या आहारात वापरली जाते. पण या डाळीपासून सोप्या पद्धतीने घरीच फेसपॅक बनवू शकता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वर्धा, 30 ऑक्टोबर: प्रत्येकाच्या घरी मसूर डाळीचा उपयोग आहारात होत असतो. ही डाळ आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. पण आहारासोबतच मसूर डाळीचा वापर तुम्ही सुंदर दिसण्यासाठी सुद्धा करू शकता. त्वचा नितळ आणि चमकदार करण्यासाठी मसूर डाळ वापरता येऊ शकते. याबाबतच वर्धा येथील ब्युटीशीयन सोनाली पाणबुडे यांनी माहिती दिलीय.
advertisement

घरीच बनवा मसूर डाळीचे फेसपॅक

1)मसुरची डाळ 5 मिनिटे भिजवून त्याची मिक्सरमधून पेस्ट करून घ्या. त्यात कच्चं दूध ऍड करून चेहऱ्यावर मसाज करून लावा आणि 15-20 मिनिटांनी नॉर्मल पाण्याने धुवून टाका.

2) या फेसपॅक मध्ये मसूर डाळ आणि गुलाबजल आणि दूध ऍड करून चेहऱ्यावर लावून सुकल्यावर धुवून टाकायचे आहे.

3) रात्री थोड्या दुधात मसूर डाळ, चंदन पावडर, संत्र्याचे साल, भिजत टाकून सकाळी मिक्सरमध्ये बारीक केलेली पेस्ट चेहऱ्यावर सर्क्युलर मोशनने लावायची आहे. 15-20 मिनिटांनी धुवून घ्या. या पॅकमुळे कोरडी त्वचा मॉश्चराईज होऊन उजळण्यास मदत होईल.

advertisement

4)मसुरच्या डाळीच्या पेस्टमध्ये मध ऍड करून चेहऱ्यावर पॅक मास्क लावा. हिवाळ्यात कोरड्या त्वचेपासून अराम मिळेल. त्वचा ग्लो करेल.

5)मसूरच्या डाळीच्या पेस्ट मध्ये बेसन किंवा तांदूळ पीठ, गुलाबजल ऍड करून चेहऱ्यावर लावल्याने चेहरा इन्स्टंट ग्लो करून चमकदार होईल, असं ब्युटीशीयन सांगतात.

तुम्ही जेवणातून कढीपत्ता काढून टाकता का? हे वाचल्यावर परत कधी असं करणार नाही! Video

advertisement

त्वचेशी संबंधित समस्या पिंपल्स, डाग आणि कोरडी त्वचा यापासून मसूरच्या डाळीने आराम मिळवता येऊ शकतो. मसूर डाळीने तुमच्या चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो येतो. धुळ, माती, मेकअप, वातावरणातील बदल आणि प्रदूषणाचा परिणाम झाल्यामुळे जर तुमची त्वचा काळवंडली असेल तर त्वचा उजळण्यासाठी मसूर डाळ तुम्ही नक्कीच वापरू शकता, असंही ब्युटिशियन सोनाली पाणबुडे सांगतात.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
मसूर डाळ आरोग्यासाठीच नाही तर सौंदर्य खुलवण्यासाठीही उपयुक्त, असा करा उपयोग, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल