तुम्ही जेवणातून कढीपत्ता काढून टाकता का? हे वाचल्यावर परत कधी असं करणार नाही! Video

Last Updated:

कढीपत्त्याचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.

+
News18

News18

वर्धा, 27 ऑक्टोबर : अनेक जण कढीपत्ता हा जेवणातून बाहेर काढून टाकतात किंवा कढीपत्ता खाणं टाळतात. मात्र याच कढीपत्त्याचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी तसेच आपल्या सौंदर्यासाठी देखील कढीपत्ता उपयोगात येऊ शकतो. कढीपत्त्यात कोणते पोषक घटक आहेत आणि कढीपत्ता खाल्ल्याचे काय फायदे आहेत याबद्दलच सविस्तर माहिती वर्ध्यातील आहारतज्ज्ञ डॉ. सरोज दाते यांनी दिली आहे.
असा करा कढीपत्ता उपयोग 
कढीपत्ता हे आरोग्यासाठी खूपच लाभदायक आहे. जर तुमच्या घरचे व्यक्ती जेवणातून कढीपत्ता काढून टाकत असतील तर कढीपत्ता मिक्सरमधून काढून भाज्यांमध्ये,कढीमध्ये किंवा चटणीमध्ये घाला कारण अशा पद्धतीने जेवणातून कढीपत्ता बाहेर काढल्या जाणार नाही, अन्नाची चव वाढेल आणि शरीराला त्याचा पुरेपूर फायदा मिळेल. रोजच्या जेवणामध्ये कढीपत्ताचा समावेश करायला पाहिजे, जेणेकरून तुमच्या शरीराततली जी काही कमतरता असेल ती भरून निघण्यासाठी मदत होते, असं सरोज दाते सांगतात.
advertisement
रक्तातील शुगर करते नियंत्रणात 
कढीपत्यायामध्ये अँटी ऑक्सिडेंटस आहेतच तसेच एंजाइम पण आहेत, शुगर लेवल नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. कारण त्यात फायबर आहेत. त्यामुळे शुगर असलेल्या रुग्णांनी कढीपत्ता खाणे फायदेशीर ठरेल. कढीपत्त्यामध्ये प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट तसेच थोडा फॅट पण आहे (100 ग्राम या नुसार सांगत आहे) कढीपत्ता मध्ये विटामिन सी आहे. कढीपत्तामध्ये विटामिन सी हे 100 ग्रॅममध्ये चार आहेत. त्याच्यात 0.93 असं आयन कन्टेन्ट आहे आणि शिवाय त्याच्यात 1.08 इतके कॅलरीज आहे.
advertisement
कोलेस्टेरॉल करते कमी 
कढीपत्त्याचे अनेक फायदे आहेत. कोलेस्टेरॉल कमी करण्याचं काम करते. बॅड फॅट काढून टाकतात, कोलेस्ट्रॉल आणि जे बॅड फॅट असतात ते रिमूव करण्याचं काम करते. अशाप्रकारे कढीपत्ता आरोग्यासाठी फायदेशीर ठरते आहे. कच्चा कढी पत्ता खाण्याचे अनेक फायदे आहेत. शरीरात वॉटर सोल्युब विटामिन्स असतात ते नष्ट होत नाही. कढी पत्ता धुवायचा आणि तसाच तो जेवणाबरोबर खाल्ला किंवा मग सकाळी उपाशीपोटी त्याचा रस तुम्ही घेतला तरी चांगलं किंवा तो चावून चावून खाल्ल्यात तरी चांगलं कारण त्यात जे काही पौष्टिक घटक असतात ते मिळत असल्याचं सरोज दाते सांगतात.
advertisement
त्वचेसाठी,सौंदर्यासाठी कढीपत्ता फायदेशीर 
स्किनसाठी किंवा तुमच्या सौंदर्यासाठीही कढीपत्ता फायदेशीर आहे. कढीपत्ता मिक्सरमधून काढायचा. त्याचा रस काढायचा आणि थोडसं बेसन,2-3 थेंब लिंबूरस आणि त्वचा कोरडी असेल तर खोबरेल तेल ऍड करून एकत्र केलेला पॅक चेहऱ्याला लावलास त्याच्या अनेक फायदे होऊ शकतात आणि स्किन वरचे जे डाग असतात ते रिमवू होण्याचं काम करतात, असं सरोज दाते सांगतात.
मराठी बातम्या/Food/
तुम्ही जेवणातून कढीपत्ता काढून टाकता का? हे वाचल्यावर परत कधी असं करणार नाही! Video
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement