सुक्या मेव्यातला अक्रोड मेंदूसारखा दिसतो. अक्रोड मेंदूसारखा दिसत असल्यानं आणि मेंदूच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असल्यानं अक्रोडला ब्रेन फूड म्हटलं जातं.
अक्रोड हे सुक्या मेव्याचा राजा मानलं जातं कारण त्यातले पोषक घटक शरीराचं अनेक आजारांपासून संरक्षण करतात. अक्रोडात ओमेगा-3 फॅटी अॅसिड, प्रथिनं, फायबर, जीवनसत्त्वं आणि खनिजं मुबलक प्रमाणात आढळतात. हृदयापासून मेंदू आणि पचनसंस्थेपर्यंत अक्रोड फायदेशीर आहे. पण अक्रोडाचे फायदे आणि तोटे आणि प्रमाणही लक्षात घेणं गरजेचं आहे.
advertisement
Hair Loss : केस गळतीवर नैसर्गिक उपचार, वाचा तज्ज्ञांनी दिलेला सल्ला
योग्य प्रमाणात खाल्लं तर अक्रोडामुळे शरीराला बळकटी मिळते, पण जास्त प्रमाणात खाल्ल्यानं नुकसान देखील होऊ शकतं. अक्रोडातले पोषक घटक, अक्रोड खाण्याचे फायदे आणि तोटे बघूया.
अक्रोडातले पोषक घटक
अक्रोडात सुमारे पासष्ट टक्के चरबी आणि पंधरा टक्के प्रथिनं असतात. त्यात कार्बोहायड्रेट्सचं म्हणजेच कर्बोदकांचं प्रमाण कमी असतं आणि त्यात जे काही असतं ते बहुतेक फायबरच्या स्वरूपात असतं. त्यात आढळणारे काही प्रमुख पोषक घटक :
कॅलरीज: सुमारे 185 प्रति औंस, औंस म्हणजे साधारण 28 ग्रॅम. प्रथिनं: 4.3 ग्रॅम, कर्बोदकं : 3.9 ग्रॅम, चरबी: 18.5 ग्रॅम. याशिवाय तांबं म्हणजेच कॉपर, मॅग्नेशियम, लोह, जस्त, सेलेनियम, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी 6 आणि फॉलिक अॅसिड देखील मुबलक प्रमाणात आढळतं.
हृदयाचं आरोग्य: अक्रोडात असलेले ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि अँटीऑक्सिडंट्स हृदयाचे ठोके सामान्य ठेवण्यासाठी आणि रक्तदाब नियंत्रणसाठी महत्त्वाचे आहेत.
मेंदूसाठी फायदेशीर: अक्रोडामुळे स्मरणशक्ती आणि विचार करण्याची क्षमता सुधारते आणि मानसिक थकवा कमी करण्यासाठी यामुळे मदत होते.
वजन नियंत्रण: फायबर आणि निरोगी चरबी म्हणजे हेल्दी फॅटस् मुळे भूकेवर दीर्घकाळ नियंत्रण ठेवता येतं, ज्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
मधुमेहात उपयुक्त: अक्रोड नियमित खाल्ल्यानं रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहते.
कर्करोगापासून संरक्षण: अक्रोडातले अँटीऑक्सिडंट्स कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यास मदत करतात.
High BP : उच्च रक्तदाबाची लक्षणं ओळखा, वेळीच लक्ष द्या, प्रकृतीचा धोका ओळखा
पुरुष आणि महिलांसाठी: अक्रोडामुळे पुरुषांमधे शुक्राणूंची गुणवत्ता सुधारते आणि महिलांमधे संप्रेरकं संतुलित करण्यासाठी आणि प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी मदत होते.
त्वचा आणि केसांचं आरोग्य: अक्रोडाच्या तेलानं त्वचेचा रंग उजळतो, केसांची मुळं मजबूत होतात आणि कोंड्याचं प्रमाण कमी होतं.
अॅलर्जी - ज्यांना काजूची अॅलर्जी आहे त्यांनी अक्रोड अजिबात खाऊ नये कारण काहींना ठराविक सुक्या मेव्याची अॅलर्जी येऊ शकते.
जास्त कॅलरी- अक्रोडात चरबी आणि कॅलरीज जास्त असतात. अक्रोड जास्त प्रमाणात खाल्ल्यानं वजन वाढू शकतं.
थायरॉईडच्या औषधांवर परिणाम - अक्रोडामुळे विशेषतः थायरॉईड औषधांचा प्रभाव कमी होऊ शकतो.
मुलांसाठी धोका - लहान मुलांना अक्रोड देताना काळजी घ्यावी, जेणेकरून अक्रोड खाताना घशात जाऊन गुदमरण्याची समस्या उद्भवणार नाही.
