शिजवलेल्या भाताचं उरलेलं पाणी केसांसाठी वरदान ठरू शकतं. शतकानुशतकं केसांची काळजी घेण्यासाठी तांदळाचं पाणी वापरलं जातंय. जपान, चीन आणि कोरियाच्या महिला त्यांच्या लांब आणि मजबूत केसांसाठी हाच घरगुती उपाय वापरतात. यात व्हिटॅमिन बी, सी, ई, अमीनो एसिड आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, यामुळे केसांना खोलवर पोषण मिळतं.
LDL : कोलेस्ट्रॉल नियंत्रणसाठी काय खावं ? डॉक्टरांनी सुचवलेत पाच पदार्थ
advertisement
- केसांची वाढ - तांदळाच्या पाण्यामुळे टाळूमधे रक्ताभिसरण सुधारतं आणि केसांच्या मुळांना पोषण मिळतं. यामुळे केसांची वाढ सुधारते आणि केस जलद वाढतात.
- केस मऊ होतात - तांदळाच्या पाण्यामुळे केस मऊ आणि चमकदार होतात. यातले इनोसिटॉल केसांच्या बाहेरील थराला मऊ करतं, ज्यामुळे केस रेशमी आणि चमकदार दिसतात.
- कोंडा आणि खाज सुटण्यापासून आराम - तांदळाच्या पाण्यात अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, टाळू स्वच्छ ठेवण्यासाठी आणि कोंडा आणि खाज दूर करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत.
Stale Food : यकृताचं आरोग्य अन्नावर अवलंबून, ताजं अन्न खाण्याचं महत्त्व ओळखा, वाचा सविस्तर
- केस तुटण्याचं आणि दुभंगण्याचं प्रमाण कमी होण्यास मदत - तांदळाच्या पाण्यानं केस तुटणं आणि दुभंगणं कमी होतं. अमिनो आम्लामुळे केसांना बळकटी मिळते आणि दुभंगण्याची समस्या हळूहळू कमी होते.
- टाळूचा पीएच संतुलित राहतो - तांदळाच्या पाण्यानं पीएच पातळी संतुलित होते, ज्यामुळे केस आणि टाळू दोन्ही निरोगी राहतात.
तांदळाच्या पाण्याचे तोटे
- टाळू संवेदनशील असेल तर काहींना टाळूवर त्रास होऊ शकतो. तांदळाच्या पाण्यामुळे ऍलर्जी किंवा जळजळ होऊ शकते.
- तांदळाचं पाणी योग्यरित्या धुवून काढलं नाही तर केस चिकट होऊ शकतात.
- तांदळाचं पाणी जास्त वेळ साठवून ठेवलं तर दुर्गंधी येऊ शकते, ज्यामुळे केसांनाही दुर्गंध येऊ शकतो.
तांदळाचं पाणी योग्यरित्या कसं वापरावं ?
भिजवण्याची पद्धत: एक कप तांदूळ धुवून दोन कप पाण्यात तीस मिनिटं भिजवा. नंतर पाणी गाळून केसांना लावा.
उकळण्याची पद्धत: तांदूळ पाण्यात उकळवा आणि शिजवल्यानंतर पाणी वेगळं करा. थंड करा आणि केसांना लावा.
तांदळाचं पाणी केसांना कसं लावायचं ?
शाम्पू केल्यानंतर, केसांना तांदळाचं पाणी लावा आणि हलक्या हातानं मसाज करा. वीस-तीस मिनिटांनी साध्या पाण्यानं धुवा. केस नैसर्गिक रीत्या सुंदर ठेवायचे असतील तर तांदळाचं पाणी हा एक उत्तम पर्याय आहे. योग्य पद्धत आणि नियमित वापर केला तरच त्याचे परिणाम दिसून येतील.
