नारळाच्या तेलात व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के सारखे पोषक घटक असतात तसेच अँटीऑक्सिडंट्स, फॅटी एसिड, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात जे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. पाहूयात नारळाच्या तेलाचे फायदे.
Skin Care : हिवाळ्यात घ्या त्वचेची काळजी, ही पेयं करतील त्वचेची निगा
ब्लॅकहेड्स - नाकावरील ब्लॅकहेड्स काढण्यासाठी नारळ तेलाचा वापर करु शकता. नारळाच्या तेलात थोडी साखर मिसळा आणि स्क्रब तयार करा. हे मिश्रण नाकाला लावा आणि दोन-तीन मिनिटं हलक्या हातानं घासा. असं केल्यानं कोणत्याही वेदनेशिवाय ब्लॅकहेड्स निघू शकतात.
advertisement
काळी वर्तुळं - डोळ्यांखालील काळी वर्तुळं कमी करण्यासाठी नारळाचं तेल खूप उपयुक्त ठरू शकतं. हे करण्यासाठी, कॉफी पावडरमधे नारळाच्या तेलाचा एक थेंब मिसळा आणि पेस्ट बनवा. मिश्रण डोळ्यांखालील भागात लावा आणि थोड्या वेळानं चेहरा धुवा. यामुळे काळी वर्तुळं कमी होण्यास मदत होते आणि त्वचा मऊ राहते.
Winter Care : केस गळती, कोंड्यावर नैसर्गिक उपाय, खास विंटर हेअर केअर टिप्स
पिग्मेंटेशन - नारळाच्या तेलात थोडी बेकिंग पावडर मिसळून लोशन बनवा. हे लोशन मान, कोपर, गुडघे किंवा काळ्या त्वचेच्या इतर कोणत्याही भागात लावा. काही मिनिटांनी ते स्वच्छ पाण्यानं धुवा.
दात - दातांवरील पिवळा थर काढून टाकण्यासाठी आणि मोत्यांसारखे चमकदार दिसण्यासाठी नारळ तेल वापरू शकता. एक चमचा नारळ तेलात चिमूटभर हळद मिसळा. आता ही पेस्ट टूथब्रशला लावा आणि दात घासा. हे नियमितपणे केल्यानं दात नैसर्गिकरित्या पांढरे होतील.
