कोलेजन हे प्रथिन, त्वचेला लवचिक आणि तरुण ठेवतं, पण चुकीची जीवनशैली, खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि तणावांमुळे याचं प्रमाण कमी होतं, ज्यामुळे वृद्धत्वाची अकाली लक्षणं दिसून येतात.
झोपेचा अभाव आणि ताण - शरीराला पुरेशी झोप मिळत नाही किंवा सतत ताण असतो तेव्हा शरीरात कॉर्टिसोल हार्मोन वाढतं. यामुळे कोलेजनचं उत्पादन कमी होतं आणि त्वचेची नैसर्गिक दुरुस्ती प्रक्रिया मंदावते.
advertisement
Malasana : पचनाबरोबर सांध्यांसाठी उपयुक्त आसन, वाचा मलासनाचे फायदे
जास्त वेळ उन्हात राहणं - तीव्र सूर्यप्रकाश आणि अतिनील किरणांमुळे त्वचेच्या वरच्या थराचं नुकसान होतं आणि कोलेजन तंतूंचं विघटन होतं. यामुळे त्वचा लवकर सैल आणि कोरडी दिसते.
प्रक्रिया केलेले अन्न आणि साखर - गोड आणि जंक फूड खाल्ल्यानं शरीरात ग्लायकेशन प्रक्रिया होते, ज्यामुळे त्वचेचा पोत खराब होतो. सुरकुत्या आणि बारीक रेषा लवकर दिसू लागतात.
धूम्रपान आणि अल्कोहोल - सिगरेट आणि अल्कोहोलमधले विषारी पदार्थ रक्तप्रवाहावर परिणाम करतात आणि मुक्त रॅडिकल्स तयार करतात. यामुळे कोलेजनचं जलद नुकसान होतं.
Swelling : पाय-घोट्यांवर सूज येण्यामागची कारणं काय ? आहारात बदल करण्याची गरज आहे का ?
चुकीची स्किनकेअर उत्पादनं वापरणं - कठोर रसायनं असलेली उत्पादनं वापरल्यानं त्वचेचा नैसर्गिक थर जाऊन कोलेजनचं नुकसान होतं. यासाठी नेहमी सौम्य आणि त्वचारोगतज्ज्ञांनी मान्यता दिलेली उत्पादनं वापरा.
कोलेजनची कमतरता जाणवू नये यासाठी काय करावं ?
रोज सनस्क्रीन लावा आणि त्वचेचं उन्हापासून रक्षण करा.
सात-आठ तास झोप घ्या.
ताण कमी करण्याचा प्रयत्न करा.
आहारात प्रथिनं आणि व्हिटॅमिन सी समृद्ध असलेले पदार्थ वापरा.
त्वचेची काळजी घेण्यासाठी कोलेजन वाढवणारे पदार्थ वापरा.
धूम्रपान आणि मद्यपान टाळा.