रायबरेली : वरण-भात आणि वरून तूप असं म्हटलं जरी, तरी अनेकजणांच्या तोंडाला पाणी येतं. कारण तूप चवीला अत्यंत tasty लागतं. शिवाय त्यात अनेक औषधी गुणधर्म असल्यामुळे त्याला 'सूपरफूड' म्हणतात. आपल्या देशात प्राचीन काळापासूनच तुपाचा विविध पदार्थांमध्ये वापर केला जातो. ते आरोग्यासाठी उपयुक्त असतं.
उत्तर प्रदेशच्या रायबरेली भागातील आयुर्वेदिक डॉक्टर स्मिता श्रीवास्तव सांगतात की, तूप हे ऊर्जास्रोत मानलं जातं. त्यात अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. अनेकजण जेवणासोबत किंवा वेगवेगळ्या पदार्थांसोबत तूप खातात. परंतु असं खाल्लेलं तूप जेवढं पौष्टिक नसतं तेवढे त्यातले पौष्टिक तत्त्व ते उपाशीपोटी खाल्ल्यावर मिळतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे उपाशीपोटी खाल्लेल्या तुपामुळे मेटाबॉलिज्म वाढतं.
advertisement
कितीही घासले दात, तरी तोंडाचा येतो वास? ही तर श्वासांची दुर्गंधी! 'अशी' करा झटक्यात दूर
तुपात कॅल्शियमसह ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि व्हिटॅमिन ए, डी, ई, के चांगल्या प्रमाणात असतात. शिवाय त्यात खनिजंही असतात. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, दररोज उपाशीपोटी चमचाभर तूप खाल्ल्यास शरिरातल्या पेशी सुदृढ राहतात. रखरखीत त्वचेवर तेज येतं. म्हणूनच हिवाळ्याच्या दिवसांमध्ये सकाळी तूप खाणं अत्यंत फायदेशीर ठरतं. त्यामुळे छाती, नाक आणि घश्यात होणारं इन्फेक्शनही दूर होतं. शिवाय यामुळे अंगात थोडीशी जरी कणकण असेल तरी त्यावरसुद्धा आराम मिळतो.
मधुमेहाच्या रुग्णांनी केळं खावं की नाही? शुगर होते कंट्रोल!
तुपात व्हिटॅमिन ए असल्याने मेंदूचं कार्य सुरळीत राहतं. तसंच तुपामुळे शरिरातली कॅल्शियमची कमतरता भरून निघते. इतकंच नाही, तर सांधेदुखीपासून आराम मिळतो आणि वजन कमी होतं.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा