मधुमेहाच्या रुग्णांनी केळं खावं की नाही? शुगर होते कंट्रोल!

Last Updated:

केळ्यात व्हिटॅमिन सी, फायबर, मॅगनीज आणि व्हिटॅमिन बी-6 भरपूर असतं. शिवाय केळं फॅट आणि कोलेस्ट्रॉलमुक्त मानलं जातं.

केळ्याला एनर्जीचं पॉव्हरहाऊस म्हणतात.
केळ्याला एनर्जीचं पॉव्हरहाऊस म्हणतात.
संजय यादव, प्रतिनिधी 
बाराबंकी : केळं हे बाजारात सहज मिळणारं फळ आहे, जे लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वजण आवडीने खातात. ते चवीला स्वादिष्ट असतं म्हणून आपण खातो, परंतु त्यात अनेक पौष्टिक गुणधर्मही असतात हे आपल्याला माहितीये का. केळ्यामुळे विविध आजारांवर मूळापासून आराम मिळतो. शिवाय या फळाच्या पानांना धार्मिकदृष्ट्याही महत्त्व आहे.
केळ्यात व्हिटॅमिन सी, फायबर, मॅगनीज आणि व्हिटॅमिन बी-6 भरपूर असतं. शिवाय केळं फॅट आणि कोलेस्ट्रॉलमुक्त मानलं जातं. महत्त्वाचं म्हणजे केळ्याला एनर्जीचं पॉव्हरहाऊस म्हणतात. तज्ज्ञ सांगतात की, केळं थंड असल्यामुळे ते खाल्ल्याने शरिरात गारवा निर्माण होतो आणि अशक्तपणा दूर होतो.
advertisement
गाढ झोप येत नसेल, सारखी चिडचिड होत असेल, प्रचंड तहान लागत असेल, शरिरात जळजळ होत असेल, तर केळं खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे शरीर छान ऊर्जावान राहतं. शिवाय शुगर, किडनी आणि पोटासंबंधित आजारांवर आराम मिळतो.
advertisement
डॉ. अमित वर्मा सांगतात की, केळ्यात साखरेचं प्रमाण जास्त असतं आणि ते चवीला प्रचंड गोड असतं म्हणून मधुमेहाच्या रुग्णांनी हे फळ खाल्ल्यास त्यांच्या शरिरातल्या साखरेचं प्रमाण वाढतं असं नाहीये. उलट मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज केळं खाल्ल्यास साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहतं आणि मधुमेहावर आराम मिळण्यास मदत होते. केळ्याचं ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतं ज्यामुळे मधुमेहाचे रुग्ण ते खाऊ शकतात. शिवाय त्यात फायबरसह अनेक पोषक तत्त्व मोठ्या प्रमाणात असतात. ज्याचे मधुमेहाच्या रुग्णांना फायदे मिळतात.
advertisement
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो… या लिंकवर क्लिक करा
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
मधुमेहाच्या रुग्णांनी केळं खावं की नाही? शुगर होते कंट्रोल!
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement