पेरू आवडीने खाता? त्याची पानंही खा! वजन होतं कमी, पुरुषांची वाढते ताकद

Last Updated:

पेरूच्या पानांमध्ये असलेल्या व्हिटॅमिन सीमुळे पचनासंबंधित सर्व समस्या दूर होतात. विशेषतः ऍसिडिटीवर मूळापासून आराम मिळतो. शिवाय या पानांमुळे दात आणि हिरड्याही मजबूत होतात.

त्वचा रोगांवर ही पानं रामबाण असतात.
त्वचा रोगांवर ही पानं रामबाण असतात.
हिना आझमी, प्रतिनिधी
देहरादून : पेरू अनेकजणांना आवडतं. परंतु आपण कधी पेरूची पानं खाल्ली आहेत का? पेरू जितकं चवीला स्वादिष्ट असतं, तितकीच ही पानं आरोग्यासाठी गुणकारी असतात. रक्तदाब, साखर आणि कोलेस्ट्रॉल या पानांमुळे नियंत्रणात राहतं. तसंच पेरूच्या पानांमुळे वजनही कमी होतं. शिवाय त्वचा रोगांवर ही पानं रामबाण असतात.
पेरूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. विशेषतः यात व्हिटॅमिन सी, ए आणि पोटॅशियम प्रचंड असतं. ज्यामुळे अन्नपचन व्यवस्थित होतं, शरिरातली साखर प्रमाणात राहते. शिवाय रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.
advertisement
ऍसिडिटी आणि बद्धकोष्ठतेवर आराम
उत्तराखंडच्या आयुर्वेदाचार्या शालिनी जुगरान सांगतात की, पेरूच्या पानांमध्ये असलेल्या व्हिटॅमिन सीमुळे पचनासंबंधित सर्व समस्या दूर होतात. विशेषतः ऍसिडिटीवर मूळापासून आराम मिळतो. शिवाय या पानांमुळे दात आणि हिरड्याही मजबूत होतात. त्यासाठी सकाळी पेरूची 7 ते 8 पानं खाण्याचा सल्ला दिला जातो.
advertisement
वजन होतं कमी
पेरूच्या पानांमुळे शरिरात कार्बोहायड्रेट शोषलं जातं नाही. त्यामुळे वजनवाढ थांबते आणि वजन कमी होण्यासही मदत मिळते. वजनासोबत शरिराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत नाही हे विशेष, त्याउलट शरिरातल्या साखरेचं प्रमाण कमी होतं.
त्वचेसाठी वरदान असतात ही पानं
त्वचेवर झालेली कोणतीही ऍलर्जी किंवा आलेला काळसरपणा या पानांमुळे दूर होतो. त्यासाठी पेरूच्या 5 ते 6 ताज्या पानांची पेस्ट बनवून ती त्वचेवर लावण्याचा सल्ला दिला जातो. त्यानंतर अर्ध्या तासाने आपण तो भाग पाण्याने धुवू शकता.
advertisement
पुरुषांसाठीही फायदेशीर
पेरूची पानं पुरुषांसाठी सर्वाधिक फायदेशीर असतात. त्यांमुळे पुरुषांमधील स्पर्म काउंट वाढतो. त्यासाठी दररोज सकाळी उपाशीपोटी दोन पेरूची पानं चावून खाण्याचा सल्ला दिला जातो. तर, या पानांचा काढा प्यायल्यास पेशींची संख्या वाढते.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
पेरू आवडीने खाता? त्याची पानंही खा! वजन होतं कमी, पुरुषांची वाढते ताकद
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement