अंगदुखीपासून डेंग्यूपर्यंत 'ही' रोपं रामबाण! घराच्या खिडकीत करू शकता लागवड
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
आयुर्वेदात अशा असंख्य वनस्पतींचा उल्लेख आहे ज्या विविध आजारांवर गुणकारी असतात. विशेष म्हणजे त्यापैकी अनेक वनस्पतींची लागवड आपण आपल्या घराच्या खिडकीतही करू शकतो. त्यापैकीच काही रोपांची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
तुळशीचं रोप हे जवळपास प्रत्येक घरात पाहायला मिळतं. आयुर्वेदात आणि धार्मिक शास्त्रात तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सकाळी उठल्यावर तुळशीची पानं खाल्ल्यास मलेरिया, डेंग्यू असे गंभीर आजार होण्यापासून शरिराचं संरक्षण होतं. शिवाय दातदुखी असेल तर तीदेखील दूर होते. इतकंच नाही, तर ताप, घसादुखी असल्यास तुळशीची पानं घातलेला चहा पिण्याचा सल्ला दिला जातो.
advertisement
वास्तूशास्त्रात मनी प्लांटला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या झाडामुळे घरात लक्ष्मीचा वास निर्माण होतो, असं मानलं जातं. शिवाय घरातली हवा शुद्ध राहण्यासाठी आयुर्वेदात हे झाड सर्वोत्तम मानलं गेलं आहे. विशेष म्हणजे मोबाईल किंवा कॉम्प्युटर आणि लॅपटॉपमधून निघणारी घातक किरणं शोषून घेण्याची क्षमता या झाडात असते. परंतु या झाडाची पानं खाऊ नये किंवा त्याचा कोणताही वापर करू नये.
advertisement
advertisement
वडाच्या झाडाला प्रचंड धार्मिक महत्त्व आहे. या झाडाची पूजा केली जाते. तर, या झाडाचं खोड आणि साल अनेक आजारांवर गुणकारी असते. वडाच्या सालीमुळे शरिराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, तर खोडामुळे केस गळणं, केस पांढरे होणं यावर आराम मिळतो. त्यासाठी खोडाची पावडर करून तिची पेस्ट केसांना लावण्याचा सल्ला दिला जातो. तसंच शरिरावर जखम झाली असल्यास त्याजागी वडाची पानं गरम करून लावल्यास रक्तस्त्राव थांबतो.
advertisement