लठ्ठपणा आणि जीवनशैलीशी संबंधित आजारांचं प्रमाणही वाढलं आहे. तासन्तास बसून काम केल्याचे परिणाम शरीरावर होतात, यामुळे लठ्ठपणा वाढतो. शारीरिक व्याधी वाढतात. खाण्याच्या वाईट सवयी, जास्त वेळ बसून राहणं आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे ही समस्या वाढते आहे. पण, दररोज योगासनं केली तर वजन नियंत्रित करता येतं. योग हा केवळ शरीर निरोगी ठेवण्यासाठी एक पर्याय नाही तर मन शांत करण्यासाठी आणि जीवन संतुलित करण्यासाठीचं एक साधन देखील आहे. आयुष मंत्रालयानं यासंदर्भात काही योगासनांची सूचना दिली आहे. यातली आसनं नियमित केल्यानं वजन कमी होण्यास मदत होईल आणि त्याच्याशी निगडीत समस्याही कमी होण्यासाठी मदत होईल.
advertisement
Skin Care: दूध - चेहऱ्यासाठीचं नैसर्गिक मॉईश्चरायझर, चेहरा दिसेल सतेज, त्वचेसाठी वरदान
1. धनुरासन - हे योगासन विशेषतः पोट आणि कंबरेची चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त मानलं जातं. या आसनात वाकून पाय हातांनी धरायचे असतात. यामुळे शरीर धनुष्याच्या आकारात येतं. या आसनानं पचनसंस्था सक्रिय होते, बद्धकोष्ठता कमी होते आणि यामुळे पाठीचे स्नायू मजबूत होतात. पण पोटात अल्सर किंवा कोणताही गंभीर पचनाचा आजार असेल तर हे आसन टाळावं.
2. सूर्यनमस्कार - दररोज बारा वेळा सूर्यनमस्कार केल्यानं शरीरात लवचिकता येते, कॅलरीज जलद बर्न होतात आणि चयापचय सुधारण्यासाठी मदत होते. यामुळे कमरेची चरबी कमी होणं, पचनशक्ती वाढणं आणि शरीरात ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते.
Stress : ताणाचं मूळ कारण समजून घ्या, आयुर्वेदात आहेत उपचार, ताण होईल कमी
3. सेतू बंध सर्वांगासन - या आसनामुळे पोट आणि मांड्यांमधील चरबी कमी होते तसंच पाठीचा कणा देखील मजबूत करण्यासाठी मदत होते. या आसनात हनुवटी छातीशी जोडल्यानं थायरॉईड ग्रंथी सक्रिय होण्यासाठी मदत होते. यामुळे हार्मोन्सचं संतुलन आणि चयापचय सुधारतं. हे सर्वांगासन ताण कमी करण्यासाठी आणि शरीराला आराम देण्यास देखील उपयुक्त आहे.
4. नौकासन - पोटाची चरबी लवकर कमी करायची असेल, तर नौकासन हा एक उत्तम पर्याय आहे. या आसनात शरीर एका बोटीचा आकार घेतं, यामुळे पोटाच्या स्नायूंवर खोलवर परिणाम होतो. या आसनामुळे वजन कमी होतं आणि पचन, रक्ताभिसरण आणि फुफ्फुसांची क्षमता देखील सुधारते. सुरुवातीला हे दहा सेकंद करा आणि सरावानं वेळ वाढवा.
बदलती जीवनशैली, त्यामुळे होणारे शारीरिक - मानसिक परिणाम यासाठी आयुष मंत्रालयाने काही प्रभावी योगासनांची सूचना दिली आहे, याचा नियमित सराव केलात तर वजन कमी होण्यास मदत होईल. ही सर्व आसनं कशी करायची याचं योग्य प्रशिक्षण गरजेचं आहे.
