Skin Care: दूध - चेहऱ्यासाठीचं नैसर्गिक मॉईश्चरायझर, चेहरा दिसेल सतेज, त्वचेसाठी वरदान
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
दुधात लॅक्टिक एसिड असते. त्यात लोहासह अनेक खनिजं असतात. यामुळे त्वचेला एक्सफोलिएट करण्यासाठी मदत होते. त्वचेवर जमा झालेल्या मृत पेशी काढून टाकण्याबरोबरच यामुळे त्वचेला पुरेशी आर्द्रताही मिळते.
मुंबई : त्वचेची नीट काळजी घेतली नाही तर त्वचा निस्तेज होऊ शकते किंवा सुरकुत्या दिसतात. पण चेहऱ्यावर दूध लावल्यानं त्वचा तरुण दिसते.
वय वाढत असताना, त्वचेवर वृद्धत्वाच्या खुणा दिसू लागतात. कपाळावर रेषा दिसू लागतात आणि गालाची त्वचा पण सैल दिसते. जीवनशैलीतले बदल आणि त्वचेची काळजी न घेतल्यानं त्वचा निस्तेज दिसते. पण यासाठी एक चांगला सोपा घरगुती उपाय आहे तो म्हणजे चेहऱ्यासाठी दुधाचा वापर. दुधामुळे त्वचा घट्ट होते आणि चेहरा उजळ दिसतो.
advertisement
दुधात लॅक्टिक एसिड असते. त्यात लोहासह अनेक खनिजं असतात. यामुळे त्वचेला एक्सफोलिएट करण्यासाठी मदत होते. त्वचेवर जमा झालेल्या मृत पेशी काढून टाकण्याबरोबरच यामुळे त्वचेला पुरेशी आर्द्रताही मिळते.
दुधापासून अँटी-एजिंग फेस पॅक बनवण्यासाठी, दुध डबल बॉयलरमध्ये गरम करा आणि त्यात जिलेटिन पावडर, जास्वंदाच्या फुलाची पावडर आणि कस्तुरी हळद पावडर घाला आणि पेस्ट तयार करा. आता या पेस्टमध्ये मध घाला. तयार केलेला फेस मास्क चेहऱ्यावर मसाज करा आणि पाच मिनिटं चेहऱ्यावर राहू द्या. पंधरा ते वीस मिनिटांनी चेहरा धुवा. यामुळे, त्वचा उजळते आणि त्वचेला घट्टपणा येतो. हा फेस मास्क आठवड्यातून तीन ते चार वेळा लावता येतो.
advertisement
कच्चं दूध
चेहऱ्यावर कच्चं दूधही लावता येतं. दररोज सकाळी चेहरा स्वच्छ करण्यासाठी कच्चं दूध लावू शकता. एका भांड्यात कच्चं दूध घ्या. चेहरा धुतल्यानंतर, कच्चं दूध कापसानं चेहऱ्यावर लावायला सुरुवात करा. हे दूध चेहऱ्यावर लावल्यानं त्वचेवरील मृत पेशीही निघून जाताना दिसतील. यामुळे चेहऱ्यावर चमक येते.
advertisement
पपईचा फेस पॅक - एक कप कच्च्या पपईत एक चमचा मध आणि एक चमचा लिंबाचा रस मिसळून फेस पॅक बनवा. हा फेस पॅक वीस मिनिटं चेहऱ्यावर लावा आणि नंतर धुवा. यामुळे त्वचा घट्ट होते.
कोरफडीचा फेस पॅक - कोरफडीचा फेसपॅक बनवण्यासाठी, एक अंड्याचा पांढरा भाग एक चमचा कोरफडीच्या गरात मिसळा. हा अँटी-एजिंग फेस पॅक अर्धा तास चेहऱ्यावर लावा आणि नंतर धुवा.
advertisement
केळीचा फेसपॅक - केळ्यातले अनेक गुणधर्म त्वचा घट्ट ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात. केळ्याचा फेसपॅक तयार करण्यासाठी, एक लहान केळं कुस्करा आणि ते एक चमचा दह्यात घाला. पंधरा ते वीस मिनिटं चेहऱ्यावर लावा आणि नंतर धुवा. हे आठवड्यातून दोनदा लावू शकता.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 12, 2025 2:16 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Skin Care: दूध - चेहऱ्यासाठीचं नैसर्गिक मॉईश्चरायझर, चेहरा दिसेल सतेज, त्वचेसाठी वरदान


