अनेक भागांतून डेंग्यूचे रुग्ण आढळल्याच्या बातम्या येत आहेत. नुकतीच एका पाच वर्षांच्या बालकाचा डेंग्यूने मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमीही समोर आली आहे. त्यामुळे सुरक्षित राहण्यासाठी या आजाराबद्दलची सर्व आवश्यक माहिती असणं महत्त्वाचं आहे. आज आपण डेंग्यूची लक्षणे आणि तो टाळण्यासाठी काय उपाययोजना करायच्या, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत...
डॉ. अक्षय श्रीवास्तव यांच्या मते, डेंग्यू हा डासांच्या चावण्यामुळे होणारा आजार आहे, जो प्रामुख्याने उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय भागांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे, जो 'एडीस' प्रजातीच्या डासांमुळे पसरतो. या संक्रमित डासांच्या चावण्यामुळे डेंग्यूचा विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करतो, ज्यामुळे आपल्याला संसर्ग होतो.
advertisement
डेंग्यूची लक्षणे कोणती?
- खूप जास्त ताप येणे
- तीव्र डोकेदुखी
- स्नायू आणि हाडांमध्ये वेदना
- त्वचेवर लालसर पुरळ उठणे (रॅशेस)
- डोळ्यांच्या मागे दुखणे
- मळमळ होणे
- पोटात दुखणे किंवा पेटके येणे
- रक्तस्त्राव होणे
- थकवा जाणवणे
- चिड़चिडेपणा
- ग्रंथींना सूज येणे
- नाक किंवा हिरड्यांमधून रक्त येणे
- त्वचा फिकट किंवा थंड पडणे
- अस्वस्थता जाणवणे
- सतत तहान लागणे.
या डासांपासून दिवसाही वाचणं गरजेचं आहे. त्यांना टाळण्यासाठी काही उपाय
- डास जास्त करून हात आणि पायांवर चावतात, त्यामुळे पूर्ण बाह्यांचे कपडे घालणे आवश्यक आहे.
- झोपताना मच्छरदाणीचा वापर करा. दिवसाही मच्छरदाणीखाली झोपा, जेणेकरून डास दूर राहतील.
- अधिक संरक्षणासाठी तुम्ही डास पळवून लावणारे स्प्रे (इन्सेक्ट रिपेलेंट) वापरू शकता.
- डास पळवणारे कॉईल किंवा वेपरिझर वापरा, ज्यामुळे डास तुमच्या घरात येणार नाहीत.
- खिडक्या आणि दारांना जाळ्या लावा, जेणेकरून डास आणि इतर कीटक घरात येणार नाहीत.
- तुमच्या घराभोवती पाणी साचू देऊ नका, जेणेकरून डास अंडी घालणार नाहीत.
- तुमच्या घरातील कुलरमधील पाणी नियमितपणे बदलत राहा, जेणेकरून त्यात डास अंडी घालणार नाहीत.
- पाण्याच्या टाक्या दररोज स्वच्छ करा आणि झाकून ठेवा.
- पाण्याची टाकी दर आठवड्याला स्वच्छ करा.
- घराभोवती कचरा साचू देऊ नका आणि कचऱ्याचा डबा झाकून ठेवा.
- घरात स्विमिंग पूल असल्यास, त्याची नियमित स्वच्छता करणे देखील आवश्यक आहे.
हे ही वाचा : Raisin water benefits : रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या 'हे' पाणी; हाडं होतील मजबूत अन् शरीर राहील तंदुरुस्त!
हे ही वाचा : झोप येत नाहीये? काळजी करू नका, लगेच करा 'हा' घरगुती उपाय; 1 मिनिटांत लागेल शांत अन् गाढ झोप