कॅल्शियमच्या कमतरतेमुळे ऑस्टियोपोरोसिस, स्नायूंमधे पेटके येणं आणि दातांचं नुकसान यासारख्या अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. कॅल्शियमसाठी काही पदार्थ आहारात असणं तब्येतीसाठी आवश्यक आहे. हे पदार्थ कॅल्शियमची कमतरता दूर करण्यास मदत करू शकतात.
Dandruff : केसांतला कोंडा कमी करण्यासाठी हे उपाय वापरुन पाहा, केस दिसतील सुंदर
दूध - दूध कॅल्शियमचा एक उत्तम स्रोत आहे. एक ग्लास दुधात अंदाजे तीनशे मिलीग्राम कॅल्शियम असतं. प्रौढ व्यक्तीच्या दैनंदिन कॅल्शियमच्या गरजेच्या सुमारे तीस टक्के असतं. दुधात व्हिटॅमिन डी देखील असतं, कॅल्शियम शोषण्यासाठी याची मदत होते.
advertisement
दही - दही कॅल्शियमचा एक चांगला स्रोत आहे. एक कप दह्यात सुमारे दोनशे मिलीग्राम कॅल्शियम असतं. दह्यात प्रोबायोटिक्स देखील असतात, हे पचनासाठी फायदेशीर असतात.
पनीर- पनीर हा कॅल्शियमचा आणखी एक चांगला स्रोत आहे. शंभर ग्रॅम पनीरमधे अंदाजे आठशे मिलीग्राम कॅल्शियम असतं. पनीरमधे प्रथिनं देखील असतात, स्नायूंची निर्मिती आणि दुरुस्तीसाठी प्रथिनं आवश्यक असतात.
हिरव्या पालेभाज्या - पालकासारख्या हिरव्या पालेभाज्यांमधे कॅल्शियम असतं. एक वाटी पालकात सुमारे शंभर मिलीग्राम कॅल्शियम असतं. हिरव्या पालेभाज्यांमधे व्हिटॅमिन के देखील असतं, हाडांच्या आरोग्यासाठी हिरव्या पालेभाज्या आवश्यक असतात.
टोफू - टोफू कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे. विशेषतः ज्यांना दुग्धजन्य पदार्थ नको वाटतात त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे. शंभर ग्रॅम टोफूमधे अंदाजे दोनशे मिलीग्राम कॅल्शियम असतं. टोफूमधे प्रथिनं देखील असतात.
Cancer Awareness: कर्करोग जागरुकता दिन, दिनचर्येत या गोष्टींकडे द्या विशेष लक्ष
बदाम - बदाम कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे. शंभर ग्रॅम बदामात अंदाजे अडिचशे मिलीग्राम कॅल्शियम असतं. बदामात निरोगी चरबी आणि फायबर देखील असतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
मासे - सॅल्मन आणि सार्डिन सारखे माशांमधे कॅल्शियम असतं. शंभर ग्रॅम सॅल्मनमधे सुमारे दोनशे मिलीग्राम कॅल्शियम असतं. माशांमधे ओमेगा-3 फॅटी एसिड देखील असतात, हृदयाच्या आरोग्यासाठीही मासे फायदेशीर असतात.
कॅल्शियम शोषण वाढवण्यासाठी व्हिटॅमिन डी सप्लिमेंटेश देखील आवश्यक आहे. व्हिटॅमिन डीचा सर्वोत्तम स्रोत सूर्यप्रकाश आहे. याव्यतिरिक्त, दूध, अंडी आणि चरबीयुक्त मासे यासारखे व्हिटॅमिन डी समृद्ध असलेले पदार्थ खाऊ शकता.
कॅल्शियमच्या कमतरतेची कोणतीही लक्षणं आढळली तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
