कारमध्ये किस करणं कायदेशीर आहे का?
भारतात पब्लिक प्लेसवर अश्लील वर्तन करणं (Obscene Act) हा कायद्याने गुन्हा मानला जातो. जर तुमची कार मॉल, पार्किंग लॉट, बागेसमोर किंवा सार्वजनिक ठिकाणी उभी असेल आणि त्या ठिकाणी तुम्ही अश्लील मानल्या जाणाऱ्या कृती करत असाल, तर पोलिस तुम्हाला थांबवू शकतात, चौकशी करू शकतात आणि परिस्थितीनुसार अटकही करू शकतात. हे नियम फक्त अविवाहित कपल्सच नाहीत तर नवरा-बायकोवरही लागू होतात.
advertisement
सार्वजनिक ठिकाणी कपल्सचे हक्क
जर तुम्ही तुमच्या पार्टनरचा हात धरून चालत असाल, बोलत असाल किंवा फक्त मिठी मारत असाल, तर त्यावर कुठलीही कायदेशीर अडचण नाही. हे वैयक्तिक नात्याचं नैसर्गिक प्रदर्शन आहे. पण जेव्हा वर्तन “अश्लील” या श्रेणीत येतं, तेव्हा पोलिस कारवाई करू शकतात. अशा प्रकरणात तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
पण या सगळ्यात पोलीस कोणत्या परिस्थितीत कारवाई करू शकतात, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे
Public Nuisance झाल्यास: जर तुमच्या वर्तनामुळे सार्वजनिक ठिकाणी उपद्रव, त्रास किंवा असुविधा निर्माण होत असेल. जर कोणी तक्रार केली आल्यास पोलीस कारवाई करु शकतात. जर पोलिसांनी थांबण्यास सांगितलं आणि तुम्ही त्याला विरोध केला किंवा वाद घातला, तरी देखील पोलीस कारवाई करु शकतात.
प्रेम व्यक्त करणं चुकीचं नाही, पण ते कुठे आणि कसं करायचं याचं भान ठेवणं आवश्यक आहे. कार हे पूर्णपणे “खाजगी स्पेस” नसून सार्वजनिक ठिकाणी उभी असताना तो पब्लिक एरिया मानला जातो. त्यामुळे विवेकाने वागणं आणि कायद्याचा आदर करणं हेच शहाणपणाचं ठरेल.
