या दुकानात जन्मलेल्या मुलांपासून 5 वर्षांपर्यंत आणि जन्मलेल्या मुलींपासून 12 वर्षांपर्यंतचे पारंपरिक पोशाख उपलब्ध आहेत. फ्रॉक्स, नऊवारी, परकर पोलकं, धोती-कुर्ता, कुर्ता-पायजमा, डिझायनर फ्रॉक्स यांसारख्या प्रकारांची खास रेंज येथे मिळते. विशेष म्हणजे हे सर्व कपडे पैठणी, खण आणि इरकल या पारंपरिक कापडांमध्ये तयार केलेले आहेत.
advertisement
किंमतीही अत्यंत वाजवी असून फ्रॉक्स, परकर पोलकं यांची सुरुवात फक्त 350 पासून सुरू होते तर पारंपरिक पैठणी ड्रेस 750 पासून उपलब्ध आहेत. नऊवारी साड्या 350 ते 2500 या दरम्यान असून त्यामध्ये 12 विविध रंगांचे पर्याय आहेत. ग्राहकाच्या गरजेनुसार कपडे कस्टमाईज करून मिळतात, त्यामुळे उत्सवासाठी परिपूर्ण पोशाख तयार करता येतो.
स्वीट बेबी शॉप ही एक पारंपरिक पोशाखांची खास जागा असून येथे देशभरातच नव्हे तर जगभर ऑनलाइन डिलिव्हरी देखील दिली जाते. पालकांना त्यांच्या मुलांसाठी दर्जेदार, आकर्षक आणि पारंपरिक पोशाख सहज मिळावेत यासाठी हे ठिकाण एक उत्तम पर्याय ठरेल असे दुकानदारांचे म्हणणे आहे. हे दुकान रानडे रोड, वामन हरी पेठेंच्या समोर डिसिल्वा हायस्कूल ग्राउंड शेजारी दादर (पश्चिम) येथे आहे.