चायनीज लसूण अत्यंत धोकादायक आहे
भारत सरकारने 2014 साली चायनीज लसणाच्या आयातीवर बंदी घातली होती. यामागचा उद्देश केवळ व्यापार नियंत्रण नव्हता, तर भारतीय शेतकऱ्यांचे संरक्षण, सार्वजनिक आरोग्य, अन्नसुरक्षा आणि जैव-सुरक्षा सुनिश्चित करणे हा होता. दुर्दैवाने आजही लहान बाजारपेठांमध्ये आणि सीमावर्ती भागात बेकायदेशीररीत्या चायनीज लसणाची विक्री होताना दिसून येते.
चायनीज लसणाचे धोके
advertisement
1 - अत्यधिक कीटकनाशकांचे अवशेष : चीनमध्ये लसणाची औद्योगिक पातळीवर लागवड केली जाते, ज्यामध्ये रसायनांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. अनेकदा हे आंतरराष्ट्रीय अन्नसुरक्षा मानकांपेक्षाही जास्त आढळते.
2 - कर्करोग आणि दीर्घकालीन आजारांचा धोका : अशा रसायनयुक्त अन्नपदार्थांचे दीर्घकाळ सेवन केल्यास कर्करोग, हार्मोन्सचे असंतुलन आणि यकृताशी संबंधित आजार होऊ शकतात.
3 - अॅलिसिनची कमतरता : अॅलिसिन हा लसणातील प्रमुख जैव-सक्रिय घटक असून तो अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म देतो. चायनीज लसणामध्ये त्याचे प्रमाण भारतीय लसणाच्या तुलनेत कमी आढळते.
भारतीय लसूण आहे आरोग्य आणि चवीचा अमूल्य ठेवा..
भारतात आढळणारा लसूण चवीला अत्यंत उत्तम असतो. तसेच तो आरोग्यासाठी रामबाण मानला जातो. भारतीय लसूण तिखट, मसालेदार आणि सुगंधाने परिपूर्ण असतो. त्याच्या सेवनामुळे अनेक आजार दूर होण्यास मदत होते. भारतीय लसणामध्ये अॅलिसिन आणि अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण अधिक असते, जे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. भारतीय लसणासारखी चव तुम्हाला चायनीज लसणामध्ये अजिबात मिळणार नाही.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.
