चॉकलेट किती धोकादायक आहे?
सगळ्या चॉकलेट्स सारख्या नसतात. काही चॉकलेट्स आरोग्यासाठी फायद्याच्या तर काही नुकसानदायकही ठरतात.
Medical News Todayच्या अहवालानुसार, डार्क चॉकलेटमध्ये असणारे फ्लॅवोनॉल्स नावाचे अँटीऑक्सिडंट्स हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. मर्यादित प्रमाणात डार्क चॉकलेट खाल्ल्याने ब्लड प्रेशर नियंत्रित राहू शकतो आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
पण हे फायदे फक्त हाय कोको असलेल्या डार्क चॉकलेटमध्येच आढळतात. बाजारात मिळणाऱ्या मिल्क चॉकलेट किंवा व्हाईट चॉकलेटमध्ये कोकोचे प्रमाण कमी आणि साखर व फॅट्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे अशा चॉकलेट्सचा अतिरेक केल्यास मोटापा, टाइप-2 डायबिटीज आणि दातांशी संबंधित समस्या वाढतात.
advertisement
बिस्किट किती आरोग्यदायक?
बिस्किट म्हणजे प्रत्येक घरात रोज खाल्ला जाणारा सोप्पा स्नॅक. पण यामागचं सत्य थोडं वेगळं आहे.
Times of Indiaच्या अहवालानुसार, बाजारात मिळणारे बहुतांश बिस्किट्स रिफाइन्ड आट्याने, हायड्रोजनेटेड ऑईलने आणि अधिक साखरेने तयार केलेले असतात. यात विटामिन, फायबर आणि मिनरल्स यांचा जवळजवळ अभाव असतो.
Ultrahuman Blog च्या मते, बिस्किट्सचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो. त्यामुळे ते खाल्ल्यानंतर ब्लड शुगर झपाट्याने वाढते आणि लवकरच पुन्हा भूक लागते. वारंवार असे स्नॅक्स खाल्ल्याने वजन वाढणे, हार्मोनल असंतुलन आणि इन्सुलिन रेसिस्टन्ससारख्या समस्या उद्भवू शकतात.
मग चॉकलेट की बिस्किट कोण जास्त धोकादायक?
तुलना केली तर सामान्य परिस्थितीत बिस्किट्स चॉकलेटपेक्षा जास्त नुकसानदायक ठरतात.
कारण त्यात ट्रान्स फॅट्स, रिफाइन्ड आटा आणि प्रिझर्व्हेटिव्ह्ज मोठ्या प्रमाणात असतात.
तर दुसरीकडे, डार्क चॉकलेट जर मर्यादित प्रमाणात आणि बिना अतिरिक्त साखरेचं खाल्लं गेलं,
तर त्यातला कोको मेंदू आणि हृदयासाठी फायदेशीर ठरू शकतो.
थोडक्यात सांगायचं तर,
बिस्किट्स तात्पुरती चव, पण दीर्घकाळाचा त्रास.
डार्क चॉकलेट योग्य प्रमाणात खाल्ल्यास आरोग्यदायक आहे.
