TRENDING:

Coronavirus in India : भारतात कोरोनाचा स्फोट! एका दिवसात मोडला 5 महिन्यांचा रेकॉर्ड, पुन्हा लॉकडाऊन?

Last Updated:

Coroavirus in India : 29 मेपर्यंत देशाच्या विविध भागात नवीन कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1200 होती. तर 12 जणांचा मृत्यू झाला होता. आता हा आकडा दुप्पटीने वाढला आहे, त्यामुळे भीती निर्माण झाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : भारतात कोरोना विषाणूचा कहर सुरू झाला आहे. गेल्या 24 तासांत या आजारामुळे 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 511 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. यामुळे मृतांची संख्या आता 19 तर संक्रमित लोकांची संख्या 2700 पेक्षा जास्त झाली आहे. सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये आढळले आहेत. महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे.
News18
News18
advertisement

देशात कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढत आहे. देशात आतापर्यंत 2710 प्रकरणं समोर आली आहेत. 24 तासांत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात दोन, पंजाब, दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक आणि गुजरातमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.

नव्या बाबा वेंगा़ची भविष्यवाणी खरी ठरणार? कोरोना परत आला, आता आणखी भयानक स्थिती?

advertisement

सर्वाधिक 1,147 रुग्ण केरळमध्ये आढळले आहेत. देशातील निम्माहून अधिक रुग्ण फक्त केरळमध्येच आहेत. तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात 424 रुग्ण आहेत. यापाठोपाठ दिल्ली, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगालचा नंबर आहे, जिथं शंभरहून अधिक रुग्णांची नोंद आहे. या राज्यांत अनुक्रमे 294, 223, 148, 148, 116 केसेस नोंदवल्या गेल्या आहेत.

Coronavirus in India : कोव्हिड लस घेतली तरी कोरोनोचा धोका आहे का?

advertisement

29 मेपर्यंत देशाच्या विविध भागात नवीन कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1200 होती. तर 12 जणांचा मृत्यू झाला होता. आता 31 मे रोजी रुग्णांचा आकडा 2710 आहे. म्हणजे गेल्या 6 महिन्यांत जितके रुग्ण आढळले, त्याच्यापेक्षा अधिक रुग्ण फक्त 24 तासांत आढळले आहेत. 6 महिन्यांतील मृतांच्या आकड्यापैकी निम्माहून अधिक मृत्यू 24 तासांत झाले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कोरोनाबाबत पुन्हा भीती निर्माण झाली आहे. आकडेवारी पाहतात आता पुन्हा लॉकडाऊन लागणार की काय असा प्रश्न निर्माण होतो आहे.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Coronavirus in India : भारतात कोरोनाचा स्फोट! एका दिवसात मोडला 5 महिन्यांचा रेकॉर्ड, पुन्हा लॉकडाऊन?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल