आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार देशात कोरोनाचे LF.7, XFG, JN.1 आणि NB.1.8.1 हे चार नवीन व्हेरिएंट आहेत. दक्षिण आणि पश्चिम भारतात पहिल्यांदा आढळले. मात्र मात्र नवे व्हेरियंट फार गंभीर नाहीत, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) देखील,नवे व्हेरियंट अती धोकादायक नसल्याचा दिलाय निर्वाळा दिला आहे. त्यामुळे लोकांनी काळजी करू नये, असं आयसीएमआरने सांगितलं आहे. पण सावधगिरी बाळगण्याचं आवाहनही केलं आहे.
advertisement
देशात कोरोनाची स्थिती काय?
देशात कोरोना रुग्णांनी 5000 चा टप्पा ओलांडला आहे. 1 जानेवारी 2025 पासून आतापर्यंत एकूण 5364 रुग्ण आढळले आहेत. तर 55 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक 1679 रुग्ण केरळात आहेत. त्यापाठोपाठ गुजरात, पश्चिम बंगाल, दिल्ली, महाराष्ट्रमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. इथल्या रुग्णांची अनुक्रमे संख्या 615, 596, 592, 548 आहे.
सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये असले तरी सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात आहे. केरळमध्ये 11 तर महाराष्ट्रात 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील 16 रुग्णांना इतर आजारांनीही ग्रासलं होतं.