आरोग्य विभागाच्या माहितीनुसार जानेवारी 2025 पासून एकूण 11,501 रुग्णांची टेस्ट झाली. त्यापैकी 814 पॉझिटिव्ह सापडले. रविवारी 1 जूनला 65 कोरोना केसेसची नोंद झाली. त्यापैकी सगळ्यात जास्त 31 रुग्ण पुण्यातून आहेत. त्यापाठोपाठ मुंबई 22, ठाणे 9, कोल्हापुरात 2 आणि नागपुरात एक आहे.
आतापर्यंत 8 लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्यापैकी 7 जणांना गंभीर आजार होता. एकूण 506 अॅक्टिव्ह केस आहेत. 300 रुग्ण बरे झाले आहेत. कोल्हापुरात पाचगावमधील वृद्धेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते.
advertisement
नव्या बाबा वेंगा़ची भविष्यवाणी खरी ठरणार? कोरोना परत आला, आता आणखी भयानक स्थिती?
मुंबईत 463 केसेस
मुंबईत 463 प्रकरणं समोर आली आहेत. जानेवारी, फेब्रुवारीत एक-एक प्रकरणं होती. मार्चमध्ये एकही केस नव्हती. पण एप्रिल-मेमध्ये सगळ्यात जास्त 461 प्रकरणं नोंदवली गेली. मुंबईत मे महिन्यांत संसर्ग झपाट्याने वाढला.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनसुसार रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं आहेत. त्यांच्यावर नियमित उपचार सुरू आहेत. तरी राज्य सरकारने यावर लक्ष ठेवायला सांगितलं आहे आणि लोकांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Coronavirus in India : कोव्हिड लस घेतली तरी कोरोनोचा धोका आहे का?
देशात कोरोनाची स्थिती काय?
देशात कोरोना रुग्णांची संख्या 4000 वर पोहोचली आहे. आरोग्यमंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, रविवार (1 जून) पर्यंत देशात कोरोनाचे एकूण 3961 सक्रिय रुग्ण आढळले आहेत. 24 तासांच 4 मृत्यूची नोंद झाली आहे. महाराष्ट्र, दिल्ली, केरळ, तामिळनाडूत प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.