भाजीपाला, फळे, मांस किंवा अगदी तेल-बिया... हा देश जगाकडून काहीही विकत घेत नाही. विशेष म्हणजे, या देशाचे एक अतिशय जवळचे नाते भारताशी आहे. आज आपण अशाच एका 'गुपित' राहिलेल्या देशाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने अमेरिका, चीन आणि भारतालाही मागे टाकले आहे.
कोण आहे हा देश?
दक्षिण अमेरिकेतील हा छोटासा देश आहे 'गुयाना' (Guyana). अवघी 8 लाख लोकसंख्या असलेल्या या देशाने ती किमया साधली आहे, जी पृथ्वीवरच्या 185 देशांनाही जमलेली नाही. 'नेचर फूड' या मासिकात प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार, गुयाना हा जगातील एकमेव असा देश आहे जो आहाराच्या सर्व 7 महत्त्वाच्या श्रेणींमध्ये (Categories) पूर्णपणे 'आत्मनिर्भर' आहे.
advertisement
गुयानाबद्दलची सर्वात रंजक गोष्ट म्हणजे, तिथली जवळपास 40 टक्के लोकसंख्या भारतीय वंशाची आहे. 19 व्या शतकात जेव्हा भारतात ब्रिटिशांचे राज्य होते, तेव्हा उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लाखो भारतीयांना तिथे उसाच्या मळ्यांमध्ये काम करण्यासाठी नेले गेले होते. आज तेच भारतीय या देशाचे मूळ रहिवासी आहेत आणि त्यांच्या मेहनतीमुळेच आज हा देश अन्नाबाबत कोणासमोरही झुकत नाही.
काय आहेत त्या 7 श्रेणी? ज्यामध्ये गुयाना नंबर 1 आहे:
1. धान्य आणि स्टार्च: तांदूळ आणि मका उत्पादनात हा देश समृद्ध आहे.
2. डाळी आणि बिया: स्वतःच्या गरजा स्वतःच पूर्ण करतो.
3. भाज्या: सर्व प्रकारचा भाजीपाला तिथेच पिकतो.
4. फळे: स्थानिक स्तरावर फळांचे भरपूर उत्पादन.
5. डेअरी: दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी कोणावरही अवलंबून नाही.
6. मांस: पोल्ट्री आणि बीफमध्ये पूर्णपणे स्वयंपूर्ण.
7. मासे: विपुल सागरी संपत्ती.
AI generated Photo
भारत, अमेरिका आणि चीन कुठे कमी पडतात?
ऐकायला आश्चर्य वाटेल, पण अमेरिका फक्त 4 श्रेणींमध्ये आत्मनिर्भर आहे, तर ब्रिटन फक्त 2 श्रेणींमध्ये. चीन आणि व्हिएतनाम 6 श्रेणींपर्यंत पोहोचले आहेत, पण त्यांना दूध किंवा डाळींसाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून राहावे लागते.
भारताची स्थिती काय? भारत हा शेतीप्रधान देश असूनही सर्व 7 श्रेणींमध्ये आत्मनिर्भर नाही.
कमी कुठे आहोत? आपण डाळी आणि कडधान्यांसाठी आजही 10-15% आयातीवर अवलंबून आहोत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपल्या स्वयंपाकाच्या तेलाची (Edible Oil) गरज पूर्ण करण्यासाठी आपण 55-60% तेल बाहेरून मागवतो.
गुयानाचे यश कशात आहे?
क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा देश भारताच्या गुजरात राज्याएवढा आहे. मात्र, या देशाचा 85% भाग घनदाट जंगलांनी व्यापलेला आहे. आपली माती आणि पाण्याचा योग्य वापर कसा करावा, हे गुयानाने जगाला दाखवून दिले आहे. तिथल्या राजधानीच्या 'जॉर्जटाउन' मार्केटमध्ये गेल्यावर तुम्हाला एकही वस्तू परदेशी दिसणार नाही; सर्व काही तिथल्याच मातीतलं असतं.
गुयाना जगाशी व्यापार करतो, पण अन्नासाठी तो कोणासमोरही हात पसरत नाही. हीच गोष्ट या देशाला आजच्या काळात 'जागतिक महासत्तां'पेक्षाही वरचढ ठरवते.
