TRENDING:

Digestion : पोटात गडबड ? चांगल्या पचनासाठी वापरा दही - गुळाची जोडी, आतडी राहतील स्वच्छ आणि रोगप्रतिकारशक्तीही राहिल चांगली

Last Updated:

पोटाच्या स्वच्छतेसाठी एक चांगला आणि नैसर्गिक उपाय म्हणजे दही आणि गुळाची सोपी रेसिपी. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो तसंच पचनसंस्था मजबूत होते आणि शरीराला अंतर्गतरित्या स्वच्छ करण्यास मदत होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : पोटाच्या समस्यांचं प्रमाण वाढतंय. खाण्याच्या बदलत्या सवयी आणि कमी शारीरिक हालचालींमुळे गॅस, अ‍ॅसिडिटी किंवा बद्धकोष्ठता अशा तक्रारी जाणवतायत. सकाळी पोट स्वच्छ झालं नाही तर  तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटत नाही.
News18
News18
advertisement

पोट जड होणं, तोंड कडू होणं आणि आळस येणं, बद्धकोष्ठता, गॅस, ही सर्व लक्षणं म्हणजे पचनसंस्था योग्यरित्या काम करत नसल्याची निदर्शक आहेत. दररोज सकाळी पोट स्वच्छ होणं म्हणजे दिवसभर फ्रेश वाटतं नाही तर दिवसभर आळस आणि चिडचिड कायम होते. पोट फुगणं, बिघडणं यामुळे अखेर मूळव्याध, आम्लता आणि त्वचेच्या समस्या देखील उद्भवू शकतात.

advertisement

पोटाच्या स्वच्छतेसाठी एक चांगला आणि नैसर्गिक उपाय म्हणजे दही आणि गुळाची सोपी रेसिपी. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो तसंच पचनसंस्था मजबूत होते आणि शरीराला अंतर्गतरित्या स्वच्छ करण्यास मदत होते.

Hair Care : छोट्या चुकांमुळे केसांचं मोठं नुकसान, मजबूत केसांसाठी खास टिप्स

दही हे एक नैसर्गिक प्रोबायोटिक आहे. दह्यातल्या चांगल्या बॅक्टेरियांमुळे आतडी निरोगी राहतात. यामुळे पचनसंस्था मजबूत होते. बद्धकोष्ठता दूर होते. गॅस आणि आम्लता कमी होते. शरीरात चांगल्या बॅक्टेरियाची संख्या यामुळे वाढते. आतड्यांमधे चांगले बॅक्टेरिया वाढले की आतड्यांची हालचाल नियमित आणि सुलभ होते.

advertisement

पचनाच्या समस्यांवर गूळ का महत्त्वाचा - गूळ म्हणजे नैसर्गिक डिटॉक्सिफायर आहे म्हणजेच गुळामुळे विषारी पदार्थ काढून टाकायला मदत होते. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी गुळ उपयुक्त आहे. यामुळे पाचक एंजाइम सक्रिय होतात. बद्धकोष्ठतेचं प्रमाण कमी होतं. तसंच यात लोहाचं प्रमाणं चांगलं असतं.

गुळामुळे आतडी स्वच्छ राहतात आणि मल मऊ करण्यास मदत होते, ज्यामुळे सकाळी पोट साफ करणं सोपं होतं.

advertisement

पचनासाठी दही - गुळाचा वापर कसा करायचा -

एक वाटी ताजं दही, एक-दोन चमचे बारीक केलेला गूळ घ्या. एक वाटी ताजं दही घ्या. त्यात बारीक केलेला गूळ मिसळा. जेवणानंतर किंवा सकाळी रिकाम्या पोटी खा. सलग पाच-सात दिवस खा.

पोट साफ करण्यासाठी दही आणि गुळाचे फायदे

बद्धकोष्ठतेपासून आराम - या मिश्रणानं मल मऊ होतो आणि आतड्यांची हालचाल सुधारते. यामुळे आतडी स्वच्छ व्हायला मदत होते.

advertisement

आतड्यांची स्वच्छता - दही आणि गुळाच्या मिश्रणानं आतड्यांमधे साचलेले विषारी पदार्थ आणि अशुद्धता हळूहळू बाहेर पडते. पोट स्वच्छ करण्यासाठी हा एक नैसर्गिक घरगुती उपाय आहे.

गॅस आणि आम्लता कमी करते - दही आणि गुळ दोन्हीही पचनासाठी उपयुक्त मानले जातात कारण दह्याचा थंडावा आणि गुळाचा उबदारपणा यामुळे पोटाचं संतुलन राखलं जातं.

रोगप्रतिकारक शक्ती - दह्यातील प्रोबायोटिक्समुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आतडी स्वच्छ झाल्यानं आणि अशुद्धता निघाल्यानं रोगप्रतिकारक शक्ती टिकून राहते.

Migraine : धुळवडीच्या उत्साहातही राहा अलर्ट, डोकेदुखीनं वाढू शकतो मायग्रेन

त्वचा - आतडी स्वच्छ असतात तेव्हा चेहऱ्यावरील मुरुम कमी होतात.

हा उपाय करताना काही गोष्टी लक्षात ठेवा -

मधुमेह असलेल्यांनी गूळ जास्त खाऊ नये.

तीव्र अतिसार होत असेल तर दही कमी खा.

हिवाळ्यात रात्री खूप थंड दही खाणं टाळा.

पोट स्वच्छ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स -

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
असं गाव जिथे फोडली जाते एकमेकांडी डोकी, रक्त निघालं तर मानता देवीचा प्रसाद!
सर्व पहा

दररोज आठ ते दहा ग्लास पाणी प्या. सॅलड, फळं, हिरव्या भाज्या यांसारखे फायबरयुक्त पदार्थ खा. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्या. दररोज वीस-तीस मिनिटं चाला. ताण कमी करण्याचा किंवा ताण व्यवस्थापन करण्यावर भर द्या.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Digestion : पोटात गडबड ? चांगल्या पचनासाठी वापरा दही - गुळाची जोडी, आतडी राहतील स्वच्छ आणि रोगप्रतिकारशक्तीही राहिल चांगली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल