काही दैनंदिन सवयी तुम्हाला अकाली वृद्ध बनवू शकतात, यात काही बदल झाले तर चेहऱ्यावरची चमक कमी होते. या पाच सवयी सांगणार आहोत ज्यामुळे महिला अकाली वृद्ध होऊ शकतात. या सवयींमधे वेळेत बदल करणं गरजेचं आहे.
या कोणत्या पाच सवयी आहेत समजून घेऊया -
आहार - फळं, हिरव्या भाज्या आणि डाळी यासारख्या पौष्टिक पदार्थांचं सेवन तब्येतीसाठी आवश्यक आहे. पण याचं प्रमाण कमी होऊन आहारात जंक, तेलकट पदार्थ वाढताना दिसतायत. याचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे लहान वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या दिसायला सुरुवात होते.
advertisement
Stroke : स्ट्रोक येतो म्हणजे काय होतं ? स्ट्रोकचं प्रमाण का वाढतंय ?
डिहायड्रेशन - व्यस्त आणि धकाधकीच्या जीवनात, महिला अनेकदा पाणी पिण्यास विसरतात. ही सवय शरीराला डिहायड्रेट करते आणि यामुळे त्वचा कोरडी होते, ज्यामुळे अकाली वृद्धत्व येतं.
धूम्रपान आणि मद्यपान - धूम्रपान आणि मद्यपानाचा शरीरावर लक्षणीय नकारात्मक परिणाम होतो. यामुळे त्वचेवर वृद्धत्वाच्या खुणा वाढतात.
Hair Conditioner : केस दिसतील मुलायम, कंडिशनर बनवण्यासाठी या टिप्स वापरा
झोपेचा अभाव - प्रत्येकानं सात ते आठ तासांची झोप घेणं महत्वाचं आहे. झोपेच्या कमतरतेमुळे महिलांच्या डोळ्याखाली काळी वर्तुळं येतात आणि चेहऱ्यावर सुरकुत्या येतात. झोप अपुरी असेल तर त्वचेवरची चमक देखील कमी होते. म्हणून, पुरेशी झोप घ्या.
ताण - वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात ताणतणाव लक्षणीयरीत्या वाढला आहे. यामुळे शरीरात हार्मोनल असंतुलन निर्माण होतं, ज्यामुळे त्वचेची चमक हळूहळू कमी होते. परिणामी, त्वचेवर अकाली वृद्धत्व येऊ लागतं.
दिनचर्येतल्या या सवयी थोड्याफार प्रमाणात बदलल्या तर तब्येत चांगली राहिल. त्यामुळे स्वत: कडे दुर्लक्ष करु नका. तब्येतीची काळजी घ्या.
