Hair Conditioner : महाग कंडिशनरला चांगला पर्याय, घरी बनवा नैसर्गिक हेअर कंडिशनर
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
कोणत्याही दुष्परिणामांशिवाय केसांची काळजी घ्यायची असेल, तर सर्वात सोपा आणि सुरक्षित उपाय म्हणजे घरी नैसर्गिक केस कंडिशनर बनवणं. घरी कंडिशनर बनवण्यासाठी स्वयंपाकघरातील अंडी, दही, मध हे तीन घटक उपयुक्त ठरतात. यापासून कंडिशनर कसं तयार करायचं पाहूया.
मुंबई : केस रेशमी आणि मऊ दिसण्यासाठी, तुम्ही काय करता ? बाजारात अनेक उत्पादनं उपलब्ध असतात, पण अनेकदा यातली रसायनं हळूहळू केसांना नुकसान पोहोचवतात. कोणत्याही दुष्परिणामांशिवाय केसांची काळजी घ्यायची असेल, तर सर्वात सोपा आणि सुरक्षित उपाय म्हणजे घरी नैसर्गिक हेअर कंडिशनर बनवणं.
घरी कंडिशनर बनवण्यासाठी स्वयंपाकघरातील अंडी, दही, मध हे तीन घटक उपयुक्त ठरतात. यापासून कंडिशनर कसं तयार करायचं पाहूया.
अंडी - अंडी आरोग्यासाठी चांगली असतातच पण केसांसाठीही एक उत्तम कंडिशनर देखील आहेत. त्यात प्रथिनं आणि फॅटी एसिड भरपूर असतात. यामुळे केसांचं पोषण होतं, केस मऊ होतात आणि केसांवर चांगली चमक येते.
advertisement
दही - दही हे एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. यामुळे केस हायड्रेटेड राहतात आणि मुलायम होतात. त्यात लॅक्टिक एसिड देखील असतं, यामुळे टाळू स्वच्छ करण्यासाठी आणि कोंडा कमी करण्यासाठी मदत होऊ शकते.
मध - मधामुळे उत्तम आर्द्रता मिळते. केसांतला ओलावा यामुळे टिकून राहतो. यामुळे केस मऊ, चमकदार आणि निरोगी राहतात. एका स्वच्छ भांड्यात अंड फोडा. केस खूप कोरडे असतील तर अंड्याचा पिवळा भाग वापरू शकता, पण केस तेलकट असतील तर अंड्याचा फक्त पांढरा भाग वापरावा. सामान्य केसांसाठी, संपूर्ण अंड वापरणं चांगलं.
advertisement
अंड्यात दोन-तीन चमचे साधं दही मिसळा. केसांची लांबी आणि कोरडेपणा यावर दह्याचं प्रमाण कमी-जास्त करता येतं. एक टेबलस्पून शुद्ध मध घाला आणि सर्व साहित्य चांगलं मिसळून एक गुळगुळीत पेस्ट तयार करा. यात गुठळ्या होणार नाहीत याची खात्री करा. केसांना शाम्पू केल्यानंतर, जास्तीचं पाणी पिळून काढा. तयार केलेलं कंडिशनर केसांना मुळांपासून टोकांपर्यंत पूर्णपणे लावा.
advertisement
अर्धा तास मिनिटे तसंच राहू द्या. आवडत असेल तर शॉवर कॅप देखील घालू शकता. नंतर केस कोमट पाण्यानं धुवा. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हे कंडिशनर वापरू शकता.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 28, 2025 8:41 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Hair Conditioner : महाग कंडिशनरला चांगला पर्याय, घरी बनवा नैसर्गिक हेअर कंडिशनर


