नारळ तेल, कोरफड गर, अॅपल सायडर व्हिनेगर, बेकिंग सोडा हे कोंडा कमी करण्यासाठी एक उत्तम उपाय आहेत. यातल्या अँटीफंगल गुणधर्मांमुळे कोंडा कमी करण्यासाठी मदत होते.
Digestion : पचनाच्या समस्यांवर नैसर्गिक टॉनिक, या उपायानं पोट वेळेत होईल स्वच्छ
नारळ तेल - नारळ तेल वापरण्याआधी थोडं गरम करा आणि टाळूला वीस-तीस मिनिटं मसाज करा, नंतर केस शाम्पूनं धुवा. यामुळे कोंडा कमी होईलच पण केस मजबूत होतील.
advertisement
कोरफड गर - कोरफड गर त्वचेसाठीच नाही तर केसांसाठी देखील फायदेशीर आहे. यामुळे सूज कमी करू शकते, ज्यामुळे कोंड्यापासून आराम मिळू शकतो. यासाठी, कोरफडीचा ताजा गर काढा आणि टाळूला लावा आणि पंधरा-वीस मिनिटांनी धुवा.
अॅपल सायडर व्हिनेगर - अॅपल सायडर व्हिनेगर हा कोंड्यासाठी एक नैसर्गिक उपाय आहे. हे आम्लयुक्त आहे, ज्यामुळे टाळूचा कोरडेपणा कमी होतो. त्वचेचा पीएच पातळी संतुलित करून ते बुरशीजन्य संसर्ग कमी करण्यासाठी आणि कोंडा दूर करण्यासाठीही मदत होऊ शकते. पाण्यात थोडं व्हिनेगर मिसळा आणि केसांना लावा आणि पंधरा मिनिटांनी केस धुवा.
Yogasana : खास महिलांसाठी हेल्थ टिप्स, योगासनं करा, ठणठणीत राहा
प्रोबायोटिक्स - दह्यासारखे इतर प्रोबायोटिक्स केसांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. यातले बॅक्टेरिया रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात, ज्यामुळे बुरशीजन्य संसर्गाशी लढण्यास मदत होते आणि कोंड्याची समस्या कमी होते.
बेकिंग सोडा - स्वयंपाकघरात असलेल्या बेकिंग सोड्यानं कोंडा कमी होऊ शकतो. मृत त्वचा काढून टाकण्यासाठी याची मदत होते आणि खाज कमी होते. यातल्या अँटीफंगल गुणधर्मांमुळे, कोंडा कमी व्हायला मदत होते. ओल्या केसांना बेकिंग सोडा लावा आणि टाळूला मसाज करा. ते एक ते दोन मिनिटं तसंच राहू द्या आणि नंतर शॅम्पू करा.
