TRENDING:

Room Heater Dangers : सावधान! 'या' चुकीने तुमचे हिटर रूमला बनवू शकते गॅस चेंबर; एका रात्रीत संपलं इंजिनिअरचं कुटुंब

Last Updated:

Dangers of using heaters : थंडीपासून वाचण्यासाठी अनेक जण घरात रुम हिटर किवा ब्लोअर बसवतात. परंतु ते हिटर किंवा ब्लोअर चुकीच्या वापरामुळे जीवघेणं ठरू शकतं. दिल्लीत नुकत्याच घडलेल्या एका भीषण दुर्घटनेने हे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. हिटर किंवा ब्लोअर वापरताना थोडा निष्काळजीपणा संपूर्ण कुटुंबाला महागात पडू शकतो. त्यामुळे ते वापरताना काय काळजी घ्यावी हे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक घरांत हिटर, ब्लोअर किंवा रूम हीटरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मात्र उब देणारी ही उपकरणे क्षणातच मृत्यूचा सापळा बनू शकतात याची जाणीव अनेकांना नसते. दिल्लीतील मजलिस पार्क मेट्रो स्टेशनजवळील डीएमआरसी अपार्टमेंटमध्ये घडलेली भीषण दुर्घटना ही याचाच इशारा ठरली आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी घरात बसवलेलं हिटरच रात्री झोपेतच अख्ख कुटुंब संपवेल याची कल्पनाही कुणी केली नसेल.
घरगुती हिटर सेफ्टी टिप्स
घरगुती हिटर सेफ्टी टिप्स
advertisement

या घटनेत नेमकं काय घडलं?

दिल्ली मेट्रोमध्ये असिस्टंट सेक्शन इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेले अजय विमल (वय 42), त्यांची पत्नी नीलम (वय 38) आणि मुलगी जाह्नवी हे कुटुंब डीएमआरसीच्या क्वार्टरमध्ये राहत होते. मंगळवारी पहाटे सुमारे 2.30 वाजता सोसायटीतील रहिवाशांना मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज ऐकू आला. सुरुवातीला कुणी फारसं लक्ष दिलं नाही, मात्र काही वेळातच पाचव्या मजल्यावरील एका फ्लॅटच्या बाल्कनीतून आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या.

advertisement

बेडरूमच बनली मृत्यूची खोली

फायर ब्रिगेड आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. तेव्हा धक्कादायक चित्र समोर आलं. संपूर्ण फ्लॅट जळालेला नव्हता, तर आग केवळ बेडरूमपुरती मर्यादित होती. त्याच खोलीत अजय विमल, नीलम आणि त्यांची मुलगी यांचे मृतदेह आढळले. प्राथमिक तपासात बेडरूममध्ये वापरण्यात आलेल्या हिटर किंवा ब्लोअरमुळे शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.

advertisement

कार्बन मोनोऑक्साइडने घेतला जीव

या आगीमुळे खोलीत मोठ्या प्रमाणात कार्बन मोनोऑक्साइड वायू तयार झाला. खिडक्या आणि दरवाजे पूर्णपणे बंद असल्याने ताजी हवा आत येण्याचा मार्गच नव्हता. त्यामुळे काही मिनिटांतच खोलीचे रूपांतर ‘गॅस चेंबर’मध्ये झाले. झोपेत असलेल्या कुटुंबाची या विषारी वायूमुळे शुद्ध हरपली आणि बाहेर पडण्याची किंवा मदत मागण्याची त्यांना संधीही मिळाली नाही. परिणामी गुदमरून तिघांचा मृत्यू झाला.

advertisement

हिटर किंवा ब्लोअर वापरताना काय धोके असतात?

हिटर आणि ब्लोअर सतत चालू ठेवल्यास वायरिंग गरम होऊन शॉर्ट सर्किटचा धोका वाढतो. बंद खोलीत वापरल्यास ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते आणि कार्बन मोनोऑक्साइडसारखे विषारी वायू साचतात. झोपेत असताना हे अधिक घातक ठरते. कारण लक्षणे जाणवण्याआधीच व्यक्ती बेशुद्ध पडू शकते.

वापरताना कोणती काळजी घ्यावी?

advertisement

हिटर किंवा ब्लोअर वापरताना खोलीत हवा मोकळी खेळती असणे अत्यंत गरजेचे आहे. झोपताना ही उपकरणे बंद ठेवावीत किंवा टाइमरचा वापर करावा. स्वस्त किंवा निकृष्ट दर्जाचे हिटर टाळावेत आणि वेळोवेळी वायरिंगची तपासणी करावी. बेड, पडदे किंवा ज्वलनशील वस्तूंपासून हिटर दूर अंतरावर ठेवावे. एकाच सॉकेटमध्ये अनेक उपकरणे जोडणे टाळावे.

या 5 गोष्टी कायम ठेवा लक्षात

खिडक्या बंद करू नका : हिटर सुरू असताना खोलीचे दरवाजे आणि खिडक्या पूर्णपणे बंद करू नका. थोडी तरी हवा खेळती राहील याची खात्री करा, जेणेकरून विषारी वायू खोलीत साचणार नाही.

रात्रभर हिटर सुरू ठेवू नका : झोपण्यापूर्वी खोली उबदार करा आणि झोपताना हिटर बंद करा. रात्रभर हिटर सुरू ठेवणे शॉर्ट सर्किट आणि ऑक्सिजन कमी होण्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे.

हिटरची जागा महत्त्वाची : हिटर नेहमी सपाट जमिनीवर ठेवावा. बेड, पडदे, कपडे किंवा प्लास्टिकच्या वस्तूंपासून तो किमान 3 फूट लांब असावा. हिटरच्या जवळ कोणतीही ज्वलनशील वस्तू ठेवू नका.

दर्जा तपासा (ISI मार्क) : स्वस्त किंवा स्थानिक बनावटीचे हिटर वापरणे टाळा. नेहमी ISI मार्क असलेली आणि चांगल्या दर्जाची उपकरणेच खरेदी करा. जुन्या हिटरच्या तारा खराब झाल्या असल्यास त्या त्वरित बदला.

हिटरजवळ पाण्याचा ग्लास ठेवा : हिटरमुळे खोलीतील ओलावा कमी होतो. यामुळे त्वचा कोरडी पडते आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. खोलीत एका कोपऱ्यात पाण्याचा बाऊल किंवा ग्लास ठेवल्याने आर्द्रता टिकून राहण्यास मदत होते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लहान मुलांसाठी क्युट बॅग्स, 100 रुपयांत करा खरेदी,मुंबईतील हे ठिकाण माहितीये का?
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Room Heater Dangers : सावधान! 'या' चुकीने तुमचे हिटर रूमला बनवू शकते गॅस चेंबर; एका रात्रीत संपलं इंजिनिअरचं कुटुंब
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल