फक्त 100 रुपयांत मिळतात क्युट आणि युनिक बॅग्स
दादरमध्ये मुलांसाठी खास डिझाइनच्या छोट्या, सुंदर आणि क्युट बॅग्स उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे या बॅग्सची किंमत अवघ्या 100 रुपयांपासून सुरू होते. कमी बजेटमध्ये चांगलं गिफ्ट शोधणाऱ्यांसाठी हे ठिकाण म्हणजे खजिनाच आहे.
मकर संक्रांतीसाठी खरेदी करा लहान मुलांना कपडे, किंमत 200 रुपयांपासून, मुंबईत हे आहे मार्केट
advertisement
वेगवेगळ्या डिझाइनमुळे मुलांची पसंती
या बॅग्समध्ये मुलांना आवडणारे अनेक आकर्षक पॅटर्न्स पाहायला मिळतात.
यामध्ये कार्टून कॅरेक्टर बॅग्स, अॅनिमल शेप बॅग्स, डॉल आणि प्रिन्सेस डिझाइन बॅग्स, कार, बस, सुपरहिरो थीम बॅग्स, फुलं आणि रंगीबेरंगी पॅटर्न्स, अशा विविध डिझाइनमुळे या बॅग्स लहान मुलांमध्ये चांगल्याच लोकप्रिय होत आहेत.
जाड प्लास्टिकमुळे टिकाऊ आणि सुरक्षित
या बॅग्स जाड आणि मजबूत प्लास्टिकपासून बनवलेल्या असल्यामुळे त्या टिकाऊ आहेत. लहान मुलांच्या रोजच्या वापरासाठी, फिरायला किंवा वाढदिवसाच्या रिटर्न गिफ्टसाठी या बॅग्स योग्य ठरत आहेत. स्वच्छ करायला सोप्या आणि वजनाला हलक्या असल्यामुळे पालकांनाही या बॅग्स आवडत आहेत.
दादर स्टेशनपासून अवघ्या दोन मिनिटांवर
हे ठिकाण दादर स्टेशनजवळ बेस्टला सुविधा गल्लीमध्ये आहे. स्टेशनपासून अवघ्या दोन मिनिटांच्या अंतरावरच वेगवेगळे छोटे स्टॉल्स लागलेले दिसतात. याच स्टॉल्सवर सध्या या ट्रेंडिंग बॅग्स मोठ्या प्रमाणात विक्रीला आहेत.
सध्या बाजारात ट्रेंडिंग गिफ्ट
सध्या लहान मुलांसाठी गिफ्ट म्हणून या बॅग्सना मोठी मागणी आहे. कमी किंमत, आकर्षक डिझाइन आणि टिकाऊपणा यामुळे दादरमधील हा हिडन प्लेस पालकांसह गिफ्ट शोधणाऱ्यांची नवी आवड बनत आहे.





