कमावत्या बायकोला नवऱ्याने पोटगी द्यायची की नाही? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
- Published by:Priya Lad
Last Updated:
Husband Wife In Court : पतीने पतीला देण्याच्या पोटगीबाबत फॅमिली कोर्टाने निकाल दिला, या निकालाविरोधात महिलेने हायकोर्टात धाव घेतली आणि कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे.
advertisement
माहितीनुसार 2021 साली लग्न झालेलं हे कपल. हुड्यांच्या वादातून सासरच्यांनी 2022 साली घरातून बाहेर काढल्याचा आरोप पत्नीने केला आहे. आपला काही कमाईचा स्रोत नाही हे सांगून पत्नीने पतीकडे पोटगीची मागणी केली. हे प्रकरण कोर्टात गेलं. फॅमिली कोर्टाने पतीने पत्नीला महिन्याला 2500 रुपये पोटगीची हंगामी रक्कम देण्याचा निकाल दिला. पण एवढीशी पोटगीची रक्कम मिळाल्याने महिलेने दिल्ली हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला.
advertisement
advertisement
यावर पतीने सांगितलं की त्याची पत्नीही एका एनजीओमध्ये शिक्षिका आहे, जिला 10 हजार रुपये पगार आहे. जो कमीत कमी पगारापेक्षाही खूप कमी असल्याचं कोर्टाने म्हटलं. तसंच पतीने पूर्ण बँक स्टेटमेंटही दिलेलं नाही, जे दिलं त्यात तिच्या पगाराबाबत कोणतंच ट्रान्झॅक्शन नाही. कोर्टाने पत्नी अकरावी शिकल्याचा हवाला देत पुराव्याशिवाय पतीचा दावा काहीच कामाचा नाही. शिवाय पोटगीची हंगामी रक्कम देताना पत्नी कमावते, ती स्वतःला सांभाळू शकते, हे मानणं योग्य नाही.
advertisement









