नव्या CNG SUVचा मार्केटमध्ये धुमाकूळ! किंमत फक्त ₹6.89 लाख, Brezza ला टक्कर
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
2026 Nissan Magnite CNG AMT ची किंमत ही ₹6.89 लाखांपासून सुरु होते. यामध्ये चार व्हेरिएंट - एसेन्टा, एन-कनेक्टा, टेक्ना आणि टेक्ना+मिळतात. यामध्ये 1.0L नॅचुरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनसह फॅक्ट्री फिटेड सीएनजी किट आहे.
2026 Nissan Magnite CNG AMT: 2026 निसान मॅग्नाइट सीएनजी आता एएमटी (ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन) सह 6.89 लाख रुपयांची सुरुवातीच्या किंमतीत उपलब्ध आहे. सीएनजी-एएमटी एसेन्टा, एन-कनेक्टा, टेक्ना आणि टेक्ना + व्हेरिएंट उपलब्ध आहेत. ज्याची किंमत जवळपास 7.89 लाख रुपये, 8.51 लाख रुपये, 9.38 लाख रुपये आणि 9.70 लाख रुपये आहे.
advertisement
advertisement
advertisement
ड्युअल-टोन लेदरेट अपहोल्स्ट्री, चार-रंगी अॅम्बियंट लाइटिंग, 8-इंच टचस्क्रीन आणि 7-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आधुनिक टेक्नॉलॉजीचा अनुभव देतात. मागील एसी व्हेंट्स, ऑटो-डिमिंग आयआरव्हीएम, 360-डिग्री कॅमेरा, वायरलेस चार्जर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, टाइप-सी चार्जिंग पोर्ट आणि इलेक्ट्रिक सनरूफ सारख्या फीचर्समुळे आराम आणि कनेक्टिव्हिटी वाढते. शिवाय, सीटबेल्ट रिमाइंडर असलेल्या सर्व सीटसाठी रिमोट स्टार्टसह की फोब, ऑटो हेडलाइट्स, सहा एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण आणि तीन-पॉइंट सीटबेल्ट आहेत.
advertisement
2026 Nissan Magnite पेट्रोल इंजिन : निसान मॅग्नाइट लाइनअप 1.0 लिटर नॅच्युरली एस्पिरेटेड पेट्रोल आणि 1.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन ऑप्शनसह येते. नॅच्युरली एस्पिरेटेड इंजिन 72 पीएसची जास्तीत जास्त पॉवर आणि पीक टार्क जनरेट करते. तर टर्बो-पेट्रोल इंजिन 100 पीएसची पॉवर आणि 96 एनएमचा टार्क जनरेट करते. यामध्ये स्टँडर्ड हे म्हणून 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येते.
advertisement
मायलेज आणि गिअरबॉक्स ऑप्शन : एनए पेट्रोल इंजिनमध्ये 5-स्पीड एएमटी युनिट देखील येते, तर टर्बो-पेट्रोल इंजिनमध्ये पर्यायी सीव्हीटी ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आहे. निसानचा दावा आहे की मॅग्नाइट 19.4 किमी/ली (एनए पेट्रोल एमटी), 19.7 किमी/ली (एनए पेट्रोल एएमटी), 20 किमी/ली (टर्बो-पेट्रोल एमटी) आणि 17.4 किमी/ली (टर्बो-पेट्रोल सीव्हीटी) ची इंधन कार्यक्षमता देते.









