Oscars 2026 च्या शर्यतीत या पाच फिल्म, तुम्ही पाहिल्यात का या मूव्ही?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Oscars 2026 : 'ऑस्कर 2026'साठी देशातील पाच फिल्म शर्यतीत आहेत. यातील ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा चॅप्टर 1' या फिल्मकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
Oscars 2026 : भारतीय सिनेमाचं जगभरात कौतुक होत आहे. 'ऑस्कर 2026'मध्ये अनेक भारतीय सिनेमे शर्यतीत आहेत. अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायंसेजने नुकतीच सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या कॅटेगरीतील फिल्मची घोषणा केली आहे. यात 201 फिल्म सिलेक्ट असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या 201 मध्ये पाच भारतीय फिल्मचा समावेश आहे. यात 'कांतारा : चॅप्टर 1','महावतार नरसिम्हा','टूरिस्ट फॅमिली','तन्वी द ग्रेट' आणि 'सिस्टर मिडनाइट' या फिल्मचा समावेश आहे. या सर्व फिल्म ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट फिल्म, दिग्दर्शन, अभिनय, सिनेमेटोग्राफी आणि स्क्रीनप्ले अशा विविध कॅटेगरीमध्ये सामिल आहेत. हॉलिवूडच्या फिल्मसोबत या फिल्म सामना करत आहेत.
कांतारा: चॅप्टर 1 : होम्बले फिल्म्सने सोशल मीडियावर जाहीर केलं आहे की 'कांतारा: चॅप्टर 1' आणि 'महावतार नरसिम्हा' या फिल्म ऑस्करसाठी पाठवण्यात आल्या आहेत. ऋषभ शेट्टीची ही 2025 मधील एक सर्वोत्कृष्ट फिल्म आहे. या फिल्ममध्ये रुक्मिणी वसंत आणि गुलशन देवैया हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या सिनेमाने जगभरात 850 कोटी रुपयांची कमाई केली होती. या सिनेमाची कथा खरी आणि भावनिक आहे. या फिल्मकडून ऑस्करसाठी प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा आहेत.
advertisement
महावतार नरसिम्हा : 'महावतार नरसिम्हा' या एनिमेटेड फिल्मने नवा रेकॉर्ड केला आहे. जगभरात 325 कोटी रुपयांची कमाई करत ही देशातील सर्वात यशस्वी अॅनिमेटेड फिल्म ठरली आहे. ऑस्करमधील अॅनिमेटेड फीचर कॅटेगरीत या फिल्मची निवड करण्यात आली आहे.
'कांतारा:चॅप्टर 1' आणि 'महावतार नरसिम्हा' या फिल्मसह आणखी तीन भारतीय सिनेमांनीही सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या लिस्टमध्ये आपली जागा निर्माण केली आहे. यात टूरिस्ट फॅमिली, तन्वी द ग्रेट आणि सिस्टर मिडनाइट या फिल्मचा समावेश आहे. 'टूरिस्ट फॅमिली' ही फिल्म साऊथमध्ये सुपरहिट ठरली होती. 'तन्वी द ग्रेट'च्या माध्यमातून अनुपम खेर दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. 'सिस्टर मिडनाइट'मध्ये राधिका आपटेने दमदार भूमिका साकारली आहे. या वेगवेगळ्या जॉनरच्या फिल्ममध्ये भारतीय सिनेमांची विविधता पाहायला मिळते.
advertisement
'होमबाउंड'चं मोठं यश
view commentsनीरज घायवानच्या 'होमबाउंड'मध्ये ईशान खट्टर, विशाल जेठवा आणि जान्हवी कपूर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ही बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म कॅटेगरीतील 15 फिल्ममध्ये ही फिल्म शॉर्टलिस्ट झाली आहे. ही फिल्म भारताची अधिकृत एन्ट्री होती. आता ही फिल्म फायनल नॉमिनेशनच्या शर्यतीतदेखील आहे. आता 201 फिल्मला टक्कर देत कोणता सिनेमा बाजी मारणार हे पाहावे लागेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 09, 2026 5:12 PM IST









