तारा सुतारियानंतर बोनी कपूरच्या लाडक्या लेकीचंही ब्रेकअप, झटक्यात मोडलं 2 वर्षांचं रिलेशनशिप

Last Updated:
Khushi Kapoor-Vedang Raina Breakup: तारा सुतारिया आणि वीर पहाडिया यांचा ब्रेकअप झाला असतानाच, आता आणखी एका बॉलिवूड कपलचं ब्रेकअप झाल्याची बातमी समोर आली आहे.
1/7
मुंबई: बॉलिवूडमध्ये रोज अनेक जोड्या बनतात आणि अनेक जोड्या तुटतातही. काही तासांपूर्वीच बॉलिवूडमधील पॉप्युलर कपल तारा सुतारिया आणि वीर पहाडिया यांचा ब्रेकअप झाला. सगळं सुरळीत सुरू असताना त्यांनी घेतलेला निर्णय पाहून चाहत्यांच्या भुवया उंचावल्या.

advertisement
2/7
काही महिन्यांपूर्वीच रिलेशनशिप कन्फर्म केलेल्या तारा आणि वीर यांचा एपी ढिल्लोंच्या कॉन्सर्टमध्ये झालेल्या गोष्टीमुळे ब्रेकअप झाला असल्याचा अंदाज बांधला जात आहे. असे असतानाच, आता आणखी एका बॉलिवूड कपलचं ब्रेकअप झाल्याची बातमी समोर आली आहे.

3/7
हे लोकप्रिय कपल म्हणजे खुशी कपूर आणि वेदांग रैना. झोया अख्तरच्या 'द अर्चीज' या सिनेमातून या दोघांच्या प्रेमाला सुरुवात झालेली. मात्र, आता हे कपल वेगळं झाल्याची चर्चा बी-टाऊनमध्ये रंगली आहे. गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेली ही जोडी आता विभक्त झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

4/7
खुशी आणि वेदांगला अनेकदा हाय-प्रोफाइल पार्ट्या, कौटुंबिक सोहळे आणि अगदी अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या शाही लग्नातही एकत्र पाहिलं गेलं होतं. एप्रिल २०२५ मध्ये खुशीने एका खास नेकलेसमधून आपल्या नात्याची अप्रत्यक्ष कबुली चाहत्यांना दिली होती. पण आता अचानक आलेल्या या ब्रेकअपच्या वृत्ताने दोघांच्याही चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

5/7
एका बाजूला इंडस्ट्रीतील सूत्रांनी त्यांच्या ब्रेकअपवर शिक्कामोर्तब केलं असलं, तरी खुशी किंवा वेदांग या दोघांनीही अद्याप यावर कोणतंही अधिकृत भाष्य केलेलं नाही.

6/7
वेदांगने यापूर्वी एका मुलाखतीत खुशीबद्दल बोलताना म्हटलं होतं की,
वेदांगने यापूर्वी एका मुलाखतीत खुशीबद्दल बोलताना म्हटलं होतं की, "आमच्यात एक नैसर्गिक सहजता आहे. आमचं नातं खूप खरं आणि साधं आहे. आम्ही खूप चांगले मित्र आहोत आणि आमच्या आवडीनिवडीही खूप सारख्या आहेत." पण हे नातं का तुटलं, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
advertisement
7/7
खुशी कपूरचं प्रोफेशनल आयुष्य मात्र सध्या जोरात आहे. 'द अर्चीज'मधून पदार्पण केल्यानंतर तिने जुनैद खानसोबत 'लव्हयापा' आणि इब्राहिम अली खानसोबत 'नादानियाँ' या चित्रपटांत काम केलं. सध्या ती तिच्या आईच्या, म्हणजेच श्रीदेवींच्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'मॉम' चित्रपटाच्या सीक्वेलवर, म्हणजेच 'मॉम २' वर काम करत आहे.

Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement