महिलांनो ही संधी नका सोडू, थ्री पीस ड्रेस मिळतोय फक्त 500 रुपयांत, मुंबईत इथं करा खरेदी
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Mohan Najan
Last Updated:
या स्टॉलवर महिलांसाठी थ्री पीस ड्रेस अवघ्या 500 रुपयांत उपलब्ध करून दिले जात आहेत.
मुंबई : दादर परिसरातील खरेदीप्रेमींना आकर्षित करणारा एक खास स्टॉल सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. दादरमधील सुविधाच्या गल्लीतील नक्षत्र मॉलच्या बाहेर उभारण्यात आलेल्या या स्टॉलवर महिलांसाठी थ्री पीस ड्रेस अवघ्या 500 रुपयांत उपलब्ध करून दिले जात आहेत. विशेष म्हणजे या ड्रेसमध्ये कुर्ता, पॅन्ट आणि दुप्पटा असा संपूर्ण सेट मिळत असल्याने ग्राहकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.
या स्टॉलवर असंख्य प्रकारच्या व्हरायटीज उपलब्ध असून विविध रंगसंगती, आकर्षक डिझाइन्स आणि आधुनिक तसेच पारंपरिक पॅटर्न्स येथे पाहायला मिळतात. सध्या बाजारात असेच थ्री पीस ड्रेस बाहेरच्या दुकानांमध्ये 800 ते 900 रुपयांना विकले जात असताना, येथे मात्र ते थेट होलसेल दरात उपलब्ध करून दिले जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांपासून ते छोटे व्यापारी आणि बुटीक चालकांपर्यंत अनेकजण या स्टॉलकडे खरेदीसाठी येत आहेत.
advertisement
स्टॉल चालकांनी सांगितले की, ते थेट होलसेलमध्ये विक्री करत असल्यामुळे दर कमी ठेवणे शक्य झाले आहे. तसेच, एखाद्या ग्राहकाला जास्त प्रमाणात म्हणजेच होलसेलमध्ये माल घ्यायचा असल्यास दरात आणखी सूट दिली जाते. यामुळे व्यवसाय करणाऱ्यांसाठी ही एक चांगली संधी ठरत आहे.
advertisement
सणासुदीचा हंगाम, लग्नसराई आणि दैनंदिन वापरासाठी योग्य असे हे ड्रेस असल्यामुळे महिलांची मोठी गर्दी येथे पाहायला मिळत आहे. कमी दरात चांगल्या दर्जाचे कपडे मिळत असल्याने हा स्टॉल सध्या दादर परिसरातील खरेदीदारांचे विशेष आकर्षण ठरत आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 09, 2026 4:28 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
महिलांनो ही संधी नका सोडू, थ्री पीस ड्रेस मिळतोय फक्त 500 रुपयांत, मुंबईत इथं करा खरेदी









