लहान मुलांसाठी क्युट बॅग्स, फक्त 100 रुपयांत करा खरेदी, मुंबईतील हे ठिकाण माहितीये का?
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
विशेष म्हणजे या बॅग्सची किंमत अवघ्या 100 रुपयांपासून सुरू होते. कमी बजेटमध्ये चांगलं गिफ्ट शोधणाऱ्यांसाठी हे ठिकाण म्हणजे खजिनाच आहे.
मुंबई: लहान मुलांचा वाढदिवस असो, एखादा खास प्रसंग असो किंवा नुसतंच त्यांना आनंद द्यायचा असो काय गिफ्ट द्यावं? हा प्रश्न आजही अनेक पालकांना पडतो. बाजारात गिफ्टचे अनेक पर्याय उपलब्ध असले तरी काहीतरी युनिक, क्युट आणि परवडणाऱ्या किमतीत घ्यायचं असेल, तर दादरमधील एक ठिकाण सध्या चांगलाच चर्चेत आहे.
फक्त 100 रुपयांत मिळतात क्युट आणि युनिक बॅग्स
दादरमध्ये मुलांसाठी खास डिझाइनच्या छोट्या, सुंदर आणि क्युट बॅग्स उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे या बॅग्सची किंमत अवघ्या 100 रुपयांपासून सुरू होते. कमी बजेटमध्ये चांगलं गिफ्ट शोधणाऱ्यांसाठी हे ठिकाण म्हणजे खजिनाच आहे.
advertisement
वेगवेगळ्या डिझाइनमुळे मुलांची पसंती
या बॅग्समध्ये मुलांना आवडणारे अनेक आकर्षक पॅटर्न्स पाहायला मिळतात.
यामध्ये कार्टून कॅरेक्टर बॅग्स, अॅनिमल शेप बॅग्स, डॉल आणि प्रिन्सेस डिझाइन बॅग्स, कार, बस, सुपरहिरो थीम बॅग्स, फुलं आणि रंगीबेरंगी पॅटर्न्स, अशा विविध डिझाइनमुळे या बॅग्स लहान मुलांमध्ये चांगल्याच लोकप्रिय होत आहेत.
advertisement
जाड प्लास्टिकमुळे टिकाऊ आणि सुरक्षित
या बॅग्स जाड आणि मजबूत प्लास्टिकपासून बनवलेल्या असल्यामुळे त्या टिकाऊ आहेत. लहान मुलांच्या रोजच्या वापरासाठी, फिरायला किंवा वाढदिवसाच्या रिटर्न गिफ्टसाठी या बॅग्स योग्य ठरत आहेत. स्वच्छ करायला सोप्या आणि वजनाला हलक्या असल्यामुळे पालकांनाही या बॅग्स आवडत आहेत.
दादर स्टेशनपासून अवघ्या दोन मिनिटांवर
हे ठिकाण दादर स्टेशनजवळ बेस्टला सुविधा गल्लीमध्ये आहे. स्टेशनपासून अवघ्या दोन मिनिटांच्या अंतरावरच वेगवेगळे छोटे स्टॉल्स लागलेले दिसतात. याच स्टॉल्सवर सध्या या ट्रेंडिंग बॅग्स मोठ्या प्रमाणात विक्रीला आहेत.
advertisement
सध्या बाजारात ट्रेंडिंग गिफ्ट
view commentsसध्या लहान मुलांसाठी गिफ्ट म्हणून या बॅग्सना मोठी मागणी आहे. कमी किंमत, आकर्षक डिझाइन आणि टिकाऊपणा यामुळे दादरमधील हा हिडन प्लेस पालकांसह गिफ्ट शोधणाऱ्यांची नवी आवड बनत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 09, 2026 3:03 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
लहान मुलांसाठी क्युट बॅग्स, फक्त 100 रुपयांत करा खरेदी, मुंबईतील हे ठिकाण माहितीये का?









