41 वर्षांपूर्वीचा हा फेमस TV शो, ज्यात झळकलेत रामायण-महाभारतातील सर्वच कलाकार, 26 एपिसोडने रचला इतिहास

Last Updated:
India Most Famous TV Show : 80-90 च्या दशकातील छोट्या पडद्यावरील सर्वच कार्यक्रमांनी प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. पण 41 वर्षांपूर्वी आलेल्या एका फेमस TV शोच्या 26 एपिसोडने मात्र इतिहास रचला आहे.
1/7
 80-90 च्या दशकातील छोट्या पडद्यावरील अनेक कार्यक्रमांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. दमदार कथानक आणि साधी, सरळ, सोपी भाषा हे या TV शोच्या यशाचं गुपित होतं. या टीव्ही शोमध्ये भारतीय संस्कृती, परंपरा अशा सर्व गोष्टींची झलक पाहायला मिळाली. विशेष म्हणजे हे टीव्ही शो सुरू झाले की रस्त्यावर एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळत असे. आजही या मालिकांच्या आठवणीत प्रेक्षक भावूक होतात.

advertisement
2/7
 41 वर्षांपूर्वी 1985 मध्ये दूरदर्शनवर एक लोकप्रिय शो आला होता. या शोमधील सर्व कथा या भारतीय लोककथा आणि पौराणिक कथांवर आधारित होत्या. विशेष म्हणजे या शोमधील कलाकार पुढे 'रामायण' आणि 'महाभारत' या लोकप्रिय मालिकांमध्ये झळकले.

3/7
 1985 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या मालिकेत अरुण गोविल, सुनील लहरी, अरविंद त्रिवेदी, दीपिका चिखलिया, विजय अरोडा, रमेश भटकर, मूलराज राजदा आणि लिलिपुट हे कलाकार झळकले होते.

4/7
 छोट्या पडद्यावरील या लोकप्रिय मालिकेचं नाव 'विक्रम और बेताल' असं आहे. या मालिकेची कथा राजा विक्रमादित्य आणि बेताल नामक एका प्रेताभोवती फिरणारी आहे. लहान मुलांसह वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच या मालिकेने आपलंसं केलं होतं.

5/7
 'विक्रम और बेताल' या मालिकेचे एकूण 26 एपिसोड होते. या मालिकेच्या प्रत्येक कथानकात काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यावेळी या मालिकेची लोकप्रियता खूप जास्त होती. सर्व लोक आवर्जुन दररोज न चुकता ही मालिका पाहत असे. या मालिकेने टीआरपीचे रेकॉर्डदेखील ब्रेक केले होते.

6/7
 'विक्रम और बेताल'च्या प्रत्येक भागात प्रेत बेताल राजा विक्रमला एक नवी गोष्ट ऐकवत असे. तर कथेच्या शेवटी तो राजा विक्रमला एक प्रश्नदेखील विचारत असे. एक वेगळा प्रयत्न असलेली ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपली भूमिका चोख निभावली होती.

7/7
 'विक्रम और बेताल' या मालिकेसोबत आजही अनेक प्रेक्षक जोडले गेले आहेत. आजही जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी अनेक मंडळी ही मालिका आवर्जुन पाहतात. 'विक्रम और बेताल' ही मालिका प्रेक्षकांना युट्यूब, MX प्लेअरवर पाहता येईल. IMDB ने या मालिकेला 8.3 रेटिंग दिले आहे.

BMC Election: लपवाछपवी नडली! बंडखोरांना रोखण्याच्या नादात महायुतीने मुंबईत केली मोठी चूक, विरोधकांना फ्री हिट! पडद्यामागे झालं काय?
लपवाछपवी नडली! बंडखोरांना रोखण्याच्या नादात महायुतीने मुंबईत केली मोठी चूक, विरो
  • महायुतीने आपल्या उमेदवारांबाबत कमालीची गुप्तता पाळली होती.

  • यादी जाहीर न करता निश्चित झालेल्या उमेदवारांना फोनवरून उमेदवारी अर्ज, एबी फॉर्म

  • कमालीच्या गुप्ततेचा महायुतीला फटका बसला असल्याचे दिसून आले आहे.

View All
advertisement