महापालिकेचा प्रचार शिगेला, भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून विष प्राशन, जालन्यातील धक्कादायक घटना!
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
ऐन निवडणुकीच्या धामधुमीत भारतीय जनता पार्टीला हादरवणारी घटना समोर आली आहे. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात एका भाजपच्या पदाधिकाऱ्याने जीवन संपवण्याचा प्रयत्न केला आहे.
राज्यात सध्या महानगर पालिकांच्या निवडणुकीचा प्रचार जोमात सुरू आहे. आपल्या प्रभागात कोण बाजी मारणार, कोण नगरसेवक बनणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. अशातच ऐन निवडणुकीच्या धामधुमीत भारतीय जनता पार्टीला हादरवणारी घटना समोर आली आहे. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात एका भाजपच्या पदाधिकाऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
ज्ञानेश्वर रामदास राठोड असं आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याचं नाव आहे. मागील अनेक वर्षांपासून ते भाजपसाठी काम करतात. त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी त्यांनी सुसाईड नोट देखील लिहिली होती. यात त्यांनी आत्महत्येचं कारण नमूद केलं होतं. प्रोजेक्ट मॅनेजरने आपलं काम अचानक बंद केलं. त्यामुळे आपण आर्थिक अडचणीत सापडलो, याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर राठोड हे कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतात. त्यांनी मंठा तालुक्यातील देवठाणा ते तळणी दरम्यान रस्त्याचं काम घेतलं होतं. गेल्या काही काळापासून ते हे काम करत होते. पण या कामाचं कंत्राट देणाऱ्या प्रोजेक्ट मॅनेजरने अचानक त्यांचं काम बंद केलं. शिवाय ते महिन्याला २० हजार रुपये मागत होते. पैशांची मागणी पूर्ण न केल्यानं राठोड यांची काही बिलं थकवली होती.
advertisement
कामाचं बिल न मिळाल्याने राठोड हे आर्थिक अडचणीत सापडले होते. यानंतर त्यांनी कामाच्या ठिकाणीच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. पण घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या काही जणांनी तातडीने राठोड यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. वेळेत उपचार मिळाल्याने अनर्थ टळला आहे. मात्र सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्याने ऐन निवडणुकीच्या काळात अशाप्रकारे आयुष्य संपण्याचा प्रयत्न केल्याने मंठा परिसरात खळबळ उडाली आहे.
view commentsLocation :
Jalna,Maharashtra
First Published :
Jan 09, 2026 2:18 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
महापालिकेचा प्रचार शिगेला, भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून विष प्राशन, जालन्यातील धक्कादायक घटना!










