मकर संक्रांतीसाठी खरेदी करा लहान मुलांना कपडे, किंमत 200 रुपयांपासून, मुंबईत हे आहे मार्केट

Last Updated:

संक्रांती म्हणजे काळे कपडे, तिळगुळांचे दागिने आणि पारंपरिक वेशभूषा यांचा खास उत्सव. हीच गरज लक्षात घेता दादर परिसरात पालकांसाठी एक उत्तम खरेदीची संधी उपलब्ध झाली आहे.

+
News18

News18

मुंबई : मकर संक्रांती अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून या सणानिमित्त लहान मुलांचे बोरन्हाण करण्याची तयारी अनेक घरांमध्ये सुरू झाली आहे. संक्रांती म्हणजे काळे कपडे, तिळगुळांचे दागिने आणि पारंपरिक वेशभूषा यांचा खास उत्सव. हीच गरज लक्षात घेता दादर परिसरात पालकांसाठी एक उत्तम खरेदीची संधी उपलब्ध झाली आहे.
दादरच्या रानडे रोडवरील डिसिल्व्ह हायस्कूल ग्राउंडच्या शेजारी असलेल्या स्वीट बेबी शॉपमध्ये मकर संक्रांतीसाठी खास लहान मुलांचे आकर्षक कपडे आणि दागिन्यांची मोठी रेंज उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे येथे केवळ 200 रुपयांपासून लहान मुलांसाठी सुंदर आणि पारंपरिक कपडे मिळत आहेत.
advertisement
या दुकानात मुलींसाठी न्यू बोर्नपासून ते 10 वर्षांपर्यंत, तर मुलांसाठी न्यू बोर्नपासून 5 वर्षांपर्यंतचे कपडे उपलब्ध आहेत. मुलींसाठी पैठणी फ्रॉक, खणाचे फ्रॉक, नऊवारी साडी, घागरा-चोळी यांसारख्या पारंपरिक पोशाखांचा समावेश आहे. पैठणी फ्रॉक केवळ 500 रुपयांमध्ये, तर वेलवेटचे परकर-पोळकं 750 रुपयांपासून उपलब्ध आहेत. संक्रांतीसाठी खास धोती पॅटर्नचे कपडेही 750 रुपयांपासून येथे मिळत आहेत.
advertisement
कपड्यांसोबतच मकर संक्रांतीच्या बोरन्हाणसाठी आवश्यक असलेले तिळगुळांचे दागिने देखील येथे उपलब्ध आहेत. हार, बांगड्या, कानातले अशा विविध प्रकारच्या दागिन्यांची किंमत 200 ते 300 रुपयांपर्यंत आहे. याशिवाय बोरन्हाणसाठी लागणारे डेकोरेशन आयटम्स देखील येथे मिळत असून त्यांची सुरुवात फक्त 50 रुपयांपासून होते.
कमी दरात, एकाच ठिकाणी सर्व साहित्य उपलब्ध असल्यामुळे पालकांमध्ये या दुकानाला मोठी पसंती मिळत आहे. दादरमध्ये राहणाऱ्या तसेच आसपासच्या परिसरातील नागरिकांसाठी स्वीट बेबी शॉप हे मकर संक्रांती खरेदीसाठी एक उत्तम ठिकाण ठरत आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
मकर संक्रांतीसाठी खरेदी करा लहान मुलांना कपडे, किंमत 200 रुपयांपासून, मुंबईत हे आहे मार्केट
Next Article
advertisement
Akot News: शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
  • भाजप आणि एमआयएम (AIMIM) यांची युती झाल्याने संपूर्ण देशात चर्चा

  • अकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे यांना 'कारण दाखवा' नोटीस बजावली आहे.

  • भाजपची राजकीय अडचण करणारे प्रकाश भारखळे आहेत कोण, असा प्रश्न काहींना पडला आहे.

View All
advertisement