Poco ने लॉन्च केला जबरदस्त कॅमेरासह दमदार बॅटरीचा स्मार्टफोन, पाहा किंमत किती?
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Poco M8 5G स्मार्टफोन 50MP कॅमेरा आणि मोठ्या 5520mAh बॅटरीसह लाँच करण्यात आला आहे. किंमत आणि सर्व फीचर्सविषयी सविस्तर जाणून घ्या...
Poco M8 5G Launched:Poco M8 5G स्मार्टफोन आज 8 जानेवारीला भारतात लाँच करण्यात आला आहे. या नवीन Poco हँडसेटमध्ये 6.77-इंचाचा 3D कर्व्ड डिस्प्ले, 50MP कॅमेरा आणि मोठी 5520mAh बॅटरी आहे. Poco M8 5G स्मार्टफोन 256GB पर्यंत स्टोरेज आणि 8GB RAM सह येतो. या नवीन Poco स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्सबद्दल अधिक जाणून घ्या...
advertisement
Poco M8 5G Price in India : Poco M8 5G ची 6GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ₹21,999 आहे. हाय-एंड 8GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ₹22,999 आहे. 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असलेला टॉप-एंड व्हेरिएंट 24,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. ग्राहक पहिल्या 12 तासांत फक्त 15,999 रुपयांच्या लाँच किमतीत फोन खरेदी करू शकतात.
advertisement
advertisement
advertisement
डिस्प्ले: या पोको स्मार्टफोनमध्ये 6.77-इंच (1,080×2,392 पिक्सल)ट्रिपल-कर्व्ह डिस्प्ले आहे जो 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 3200 nits पर्यंत पीक ब्राइटनेस, 387ppi पिक्सेल डेन्सिटी आणि 240Hz पर्यंत टच सॅम्पलिंग रेट देतो. फोन Wet Touch 2.0 ला देखील सपोर्ट करतो, ज्यामुळे बोटे ओली असतानाही टच रिस्पॉन्स मिळतो.
advertisement
हार्डवेअर: Poco M8 5G मध्ये 4nm प्रोसेसवर बेस्ड क्वालकॉम ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 6 Gen 3 चिपसेट आहे. स्मार्टफोनमध्ये अॅड्रेनो GPU आहे. डिव्हाइस 8GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंत इनबिल्ट स्टोरेज देते. कंपनीचा दावा आहे की हँडसेटने बेंचमार्किंग प्लॅटफॉर्म AnTuTu वर 8,25,000 पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. धूळ आणि वॉटर रेजिस्टेंससाठी फोनला IP65+IP66 रेटिंग दिले आहे. सिक्यॉरिटीसाठी, डिव्हाइसमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आहे.
advertisement
advertisement
advertisement











