Solapur News : मुलगी लग्नाला नाही म्हणाली हीच तिची चूक, बापाच्या कृत्याने सोलापूर हादरलं
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
मुलीने लग्नाच्या प्रस्तावाला नकार दिल्याने रागाच्या भरात वडिलाने मुलीला आणि पत्नीला कुऱ्हाडीच्या दांडक्याने बेदम मारहाण केली आहे.
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील कुसळंब गावात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मुलीने लग्नाच्या प्रस्तावाला नकार दिल्याने रागाच्या भरात वडिलाने मुलीला आणि पत्नीला कुऱ्हाडीच्या दांडक्याने बेदम मारहाण केली आहे. ही घटना 6 जानेवारी रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी फिर्यादी शमा फिरोज शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती फिरोज खाजा शेख, सासू लैला खाजा शेख आणि सासरे ख्वाजा वजीर शेख यांच्या विरोधात बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शमा शेख आणि फिरोज शेख यांचे 2009 मध्ये आंतरजातीय विवाह झाला असून त्यांना पाच मुले आहेत. मंगळवारी 6 जानेवारी रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादीचे पती फिरोज शेख यांनी त्याची मोठी मुलगी सानिया हिचे लग्न जमवण्यासाठी मोबाईलमध्ये एका मुलाचा फोटो दाखवला होता. पण मुलीने मोबाईलवरील फोटो पाहून हो किंवा नाही असे काहीच उत्तर न देता मौन पाळले. मुलीने काहीही न सांगितल्याने वडील फिरोज यांनी मुलीला हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली.
advertisement
मुलगी सानिया शेख हिला वडील मारत आहे हे पाहून पत्नी शमा सोडवण्यासाठीमध्ये गेली होती. सानिया लग्नाला नकार का देतेस? असे म्हणत सासरा खाजा शेख यांनी फिर्यादीचे हात पकडले तर सासूने केस ओढले. याचवेळी पती फिरोज शेख याने पत्नी शमा याच्या उजव्या हाताच्या दंडावर, मनगटावर आणि पाठीवर कुऱ्हाडीच्या लाकडी दांडक्याने मारहाण करत गंभीर जखमी केले. शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. जखमी शमा शेख यांनी बार्शी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर बार्शी तालुका पोलीस ठाण्यात पती, सासू आणि सासरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार शिंदे हे करत आहेत.
advertisement
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Jan 08, 2026 4:02 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Solapur News : मुलगी लग्नाला नाही म्हणाली हीच तिची चूक, बापाच्या कृत्याने सोलापूर हादरलं











