महेश मांजरेकर आणि खासदार संजय राऊत यांची ठाकरे बंधूंची मुलाखत घेतली. तेव्हा राज ठाकरे मुलाखतीमध्ये बोलताना म्हणाले, आज संकट महाराष्ट्रावर आहे, मुंबईवर आहे. हे संकट मराठी माणसाला समजलं आहे.काय प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात सुरु आहे हे ही माहिती आहे.एकच गोष्ट आम्ही एकत्र यायचं कारण नाही, आमच्याच अस्तित्वाची नाही तर मराठी माणसाच्या अस्तित्वाचा विषय आहे. बाहेरुन येणाऱ्यांची दादागिरी वाढत आहे.
Last Updated: Jan 08, 2026, 15:55 IST


