15 धावात 5 विकेट,बुलेट ट्रेनच्या स्पीडने मुंबईचे विकेट पडले, विजयासाठी एक रनही काढता आला नाही

Last Updated:

मुंबईचा पंजाबने धुव्वा उडवला होता. मुंबईकडे टीम इंडियातील स्टार खेळाडूंचा भरणा असून देखील त्यांचे बुलेटच्या स्पीडने 15 धावात 5 विकेट पडले. शेवटी मुंबईला एक धाव हवी होती, ही धाव काढता न आल्याने पंजाबने मुंबईचा एका धावाने पराभव केला आहे.

punjab beat mumbai by 1 runs
punjab beat mumbai by 1 runs
Vijay Hazare Trophy : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेआधी टीम इंडियाचे अनेक स्टार खेळाडू विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत घाम घालताना दिसत आहेत. त्यात आजच्या सामन्यात मुंबईचा पंजाबने धुव्वा उडवला होता. मुंबईकडे टीम इंडियातील स्टार खेळाडूंचा भरणा असून देखील त्यांचे बुलेटच्या स्पीडने 15 धावात 5 विकेट पडले. शेवटी मुंबईला एक धाव हवी होती, ही धाव काढता न आल्याने पंजाबने मुंबईचा एका धावाने पराभव केला आहे.
advertisement
खरं तर मुंबईसमोर 216 धावांचे लक्ष्य होते. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मुंबईकडून अंगक्रिश रघुवंशी आणि मुशीर खान मैदानात उतरले होते. पण अंगक्रिश 23 तर मुशीर खान 21 वर बाद झाला होता.त्यानंतर मैदानात सरफराज खान आणि श्रेयस अय्यरची एंन्ट्री झाली होती. या दोघांनी मुंबईचा डाव सावरला होता.
advertisement
सरफराज खानने मैदानात येताच पहिल्याच बॉल पासून प्रहार करायला सूरूवात केली होती. त्यामुळे त्याने अवघ्या 20 बॉवमध्ये 62 धावा कुटल्या होत्या. या खेळी दरम्यान त्याने 5 षटकार आणि 7 चौकार लगावले होते. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट हा 310 च्या आसपास होता.
advertisement
सरफराज बाद झाल्यानंतर सुर्यकुमार यादवची मैदानात एंन्ट्री झाली होती. मात्र तो फार काळ टीकला नाही आणि 15 धावांवर बाद झाला.त्याच्यापाठोपाठ शिवम दुबे देखील 12 धावांवर बाद झाला.यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने 34 बॉलमध्ये 45 धावा करून बाद झाला.
advertisement
श्रेयस अय्यर जेव्हा बाद झाला तेव्हा मुंबईची धावसंख्या 201 वर 6 विकेट अशी होती. यावेळी मुंबईला विजयासाठी अवघ्या 15 धावा हव्या होत्या. या 15 धावा 4 खेळाडूंना मिळून काढायच्या होत्या. पण पंजाबच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करून मुंबईला विजयासाठी 1 धावा हवी असताना अख्खा संघ तंबुत परतवला होता. श्रेयस अय्यरसह हार्दिक तामोर 15,साईराज पाटील 2, शशांत आतर्डे आणि ओमकार तारमले एकही धाव न काढला बाद झाले होते.त्यामुळे मुंबईचा डाव हा 26.2 ओव्हरमध्ये 215 धावांवर ऑल आऊट झाला. पंजाबकडून गुरनुर ब्रार आणि मयंक मार्कडेयने प्रत्येकी 4 विकेट घेतले होते. त्यासोबत हरप्रीत ब्रार आणि हरनुर सिंहने प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.
advertisement
दरम्यान याआधी पंजाब प्रथम फलंदाजी करताना 216 धावांवर ऑलआऊट झाला होता. पंजाबकडून रमणदिप सिंहने 72 धावांची सर्वाधिक खेळी केली होती.आणि अनमोल प्रितसिंहने 57 धावांची खेळी केली होती.त्यामुळे पंजाबने 216 धावा केल्या होत्या. मुंबईकडून मुशीर खाने तीन, तर ओमकार तारमले, शिवम दुबे आणि शशांक आतर्डे यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या होत्या आणि साईराज पाटीलने 1 विकेट घेतली होती.
advertisement
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
15 धावात 5 विकेट,बुलेट ट्रेनच्या स्पीडने मुंबईचे विकेट पडले, विजयासाठी एक रनही काढता आला नाही
Next Article
advertisement
Akot News: शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
  • भाजप आणि एमआयएम (AIMIM) यांची युती झाल्याने संपूर्ण देशात चर्चा

  • अकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे यांना 'कारण दाखवा' नोटीस बजावली आहे.

  • भाजपची राजकीय अडचण करणारे प्रकाश भारखळे आहेत कोण, असा प्रश्न काहींना पडला आहे.

View All
advertisement