Special Trains: मकर संक्रांतीनिमित्त धावणार 150 विशेष एक्सप्रेस, रेल्वेकडून आखलाय प्लान; वाचा सविस्तर
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मकर संक्रांतीचा सण जवळ येतो. या सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांप्रमाणेच भारतीय रेल्वे सुद्धा जोरदार तयारी करत आहे.
मुंबई: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मकर संक्रांतीचा सण जवळ येतो. या सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांप्रमाणेच भारतीय रेल्वे सुद्धा जोरदार तयारी करत आहे. अशातच दक्षिण मध्य रेल्वेने मकर सक्रांत सणासाठी 150 विशेष एक्सप्रेस चालवण्याची योजना जाहीर केली आहे. दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए. श्रीधर म्हणाले, "आगामी मकर संक्रांत या सणाच्या पार्श्वभूमीवर, दक्षिण मध्य रेल्वेने अनेक विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. आतापर्यंत अंदाजे 150 विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. या गाड्या प्रामुख्याने दोन तेलुगू राज्यांसाठी चालवल्या जाणार आहेत."
वृत्तसंस्था एएनआयसोबत बोलताना रेल्वे अधिकारी ए. श्रीधर पुढे म्हणाले की, "भारताच्या उत्तर, पूर्व आणि दक्षिण भागांसाठीतील प्रवाशांसाठी रेल्वे गाड्यांची आम्ही विशेष व्यवस्था केली आहे. तिरुपती आणि शिर्डीला जोडणाऱ्या विशेष गाड्या सुद्धा या एक्सप्रेसमध्ये दाखल केलेल्या आहेत. भारतीय रेल्वेकडून सणासुदीच्या काळात 600 हून अधिक गाड्या चालवल्या जात आहेत. या विशेष गाड्या दक्षिण मध्य रेल्वेवरील महाराष्ट्रातील काही प्रमुख स्थानकांशी देखील जोडले गेले आहेत. मकर संक्रांतीच्या वेळी सिंकदराबाद रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी पाहायला मिळते."
advertisement
पुढे रेल्वे अधिकारी श्रीधर यांनी दिलेल्या माहितीनुसार, "भाविकांची सणासुदीच्या काळात होणारी गर्दी पाहता ती कमी कशा पद्धतीने करता येईल, याकडे लक्ष दिले जात आहे. सध्या स्थानकाच्या नुतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे स्थानकावर प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. ही समस्या लक्षात घेता, रेल्वेकडून सिकंदराबाद रेल्वे स्टेशनवरून काही महत्त्वाच्या गाड्या कायमस्वरूपी चारलापल्ली, काचेगुडा किंवा लिंगमपल्ली येथून सोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि काही गाड्या तात्पुरत्या स्वरूपासाठी रेल्वे स्टेशन बदलण्यात आले आहेत."
Location :
Maharashtra
First Published :
Jan 09, 2026 2:59 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Special Trains: मकर संक्रांतीनिमित्त धावणार 150 विशेष एक्सप्रेस, रेल्वेकडून आखलाय प्लान; वाचा सविस्तर










