रात्रभर दणकून पार्टी केली अन् पहाटे घात, माजी गृहमंत्र्याची मुलगी आणि काँग्रेस नेत्याच्या मुलासह तिघांचा मृत्यू
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
इंदूर बायपासवरील भीषण अपघातात प्रेरणा बच्चन, प्रखर कासलीवाल आणि मान संधू यांचा मृत्यू, वाढदिवसाचा आनंद दुःखात बदलला, देश हादरला.
नशीब कधी आणि कसं थट्टा करेल याचा नेम नाही. ज्या मुलाच्या वाढदिवसाचा केक कापून आनंदाने शुभेच्छा दिल्या, त्याच मुलाचा मृतदेह पाहण्याची दुर्दैवी वेळ एका पित्यावर आली. इंदूरच्या बायपासवर शुक्रवारी पहाटे झालेल्या एका भीषण अपघाताने केवळ तीन कुटुंबंच नाही, तर अख्खा देश हादरला आहे. मध्य प्रदेशचे माजी गृहमंत्री बाला बच्चन यांची लाडकी लेक प्रेरणा आणि काँग्रेस प्रवक्ते आनंद कासलीवाल यांचा मुलगा प्रखर यांच्यासह तीन तरुणांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला.
advertisement
गुरुवारी रात्री सर्वत्र उत्साहाचं वातावरण होतं. निमित्त होतं प्रखर कासलीवाल याचा वाढदिवस. आपल्या लाडक्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ही मित्रमंडळी महू येथील एका फार्म हाऊसवर जमली होती. रात्रभर हास्य-विनोद झाले, केक कापला गेला, भविष्याची स्वप्नं रंगवली गेली. कोणालाही कल्पना नव्हती की ही त्यांची एकत्र घालवलेली शेवटची रात्र असेल.
advertisement
पहाटे सव्वा पाचच्या सुमारास पार्टी संपवून हे सर्वजण घराकडे निघाले आणि तेजाजी नगर बायपासवर काळाने झडप घातली. वेगवान नेक्सॉन कार समोरून जाणाऱ्या एका ट्रकला पाठीमागून इतक्या जोरात धडकली की कारचा पुढचा भाग चक्काचूर झाला. आत बसलेल्या प्रेरणा, प्रखर आणि मान संधू या तिघांना सावरण्याची संधीही मिळाली नाही.
advertisement
काच आणि लोखंडाच्या तुकड्यांमध्ये ही तरुण स्वप्नं चिरडली गेली. अनुष्का राठी ही तरुणी मृत्यूशी झुंज देत आहे. पोलिसांनी जेव्हा गाडीचा दरवाजा कटरने कापून त्यांना बाहेर काढलं, तेव्हा दृश्य इतकं भयाण होतं की उपस्थितांच्या काळजाचा थरकाप उडाला. रुग्णालयात जेव्हा ही बातमी पोहोचली, तेव्हा तिथे जो आक्रोश पाहायला मिळाला तो अंगावर काटा आणणारा होता.
advertisement
आपल्या पोटच्या लेकीच्या निधनाची बातमी ऐकताच माजी मंत्री बाला बच्चन यांच्या पत्नी कारमध्येच बेशुद्ध पडल्या. तर प्रखरची आई आपल्या पतीचे पाय धरून, "माझ्या मुलाला परत आणा, त्याला काही होऊ शकत नाही" अशी आर्त हाक मारत होती. ज्या हातांनी मुलाला वाढदिवसाचे आशीर्वाद दिले, त्याच हातांनी त्याच्या पार्थिवाला स्पर्श करण्याची वेळ आलेल्या त्या माऊलीचा आक्रोश पाहून रुग्णालयातील प्रत्येक व्यक्तीचे डोळे पाणावले होते.
advertisement
advertisement











