Mangal Gochar 2026: मेषसहित 5 राशींना आनंदाची बातमी; मकर संक्रांतीनंतर इनकम अनपेक्षित वाढणार

Last Updated:
Mars Transit In Capricorn: ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाच्या स्थितीला विशेष महत्त्व आहे. त्याच्या स्थितीत झालेला बदल राशीचक्रावर मोठा परिणाम दावतो. मंगळ ग्रह 16 जानेवारी रोजी धनु राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करणार आहे. मकर राशीत मंगळ उच्च स्थितीचा मानला जातो आणि ही अवस्था ज्योतिषशास्त्रात खूप शक्तिशाली समजली जाते.
1/6
मंगळ हा ऊर्जा, धाडस, पराक्रम आणि आत्मविश्वासाचा कारक ग्रह आहे. 16 जानेवारी रोजी पहाटे 4 वाजून 27 मिनिटांनी मंगळ मकर राशीत गोचर करेल. मकर संक्रांतीनंतर झालेल्या या बदलामुळे 5 राशींच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल घडून येण्याची शक्यता आहे.

advertisement
2/6
मेष रास - मंगळ हा मेष राशीचा स्वामी असल्यामुळे हे गोचर तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. या काळात कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी किंवा नेतृत्वाची संधी मिळू शकते. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातला ताण कमी होईल. तुमचं धाडस वाढेल, त्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेणं सोपं जाईल. आर्थिक परिस्थिती सुधारेल, मात्र जास्त मिळवण्यासाठी तुम्ही अधिक मेहनत करत राहाल.

3/6
सिंह रास - सिंह राशीच्या लोकांसाठी मंगळाचं हे गोचर शुभ फल देणारं ठरेल. उत्पन्नाची नवी साधनं तयार होतील. कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक यात्रेचा योग येऊ शकतो. नोकरीत तुमच्या मेहनतीचं चीज होईल आणि वरिष्ठ तुमचं कौतुक करतील. प्रतिस्पर्ध्यांवर तुम्ही मात कराल. या काळात मालमत्ता खरेदीचे योग असून आर्थिक प्रगती वेगाने होईल.

4/6
वृश्चिक रास - वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ असल्यामुळे हे गोचर तुमच्यासाठी प्रगतीचे नवे दरवाजे उघडणार आहे. आर्थिक लाभाच्या अनेक संधी मिळतील, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. करिअरमध्ये नवीन संधी चालून येतील. भावंडांसोबतचे संबंध अधिक चांगले आणि सहकार्याचे राहतील. समाजात तुमची प्रतिमा आणि मान-सन्मान वाढेल.

5/6
धनु रास - धनु राशीच्या लोकांसाठी मंगळाचं हे गोचर आर्थिक विकासाला चालना देणारं ठरेल. फायदेशीर व्यवसाय किंवा गुंतवणुकीकडे तुमचा कल वाढेल आणि त्याचा पुढे चांगला फायदा होईल. वैवाहिक आयुष्यात जोडीदारासोबतचे संबंध अधिक मधुर होतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळण्याची दाट शक्यता आहे. जुने वाद मिटतील आणि रखडलेली कामं पूर्ण होतील.

6/6
मीन रास - मीन राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये या काळात मोठी प्रगती होण्याचे संकेत आहेत. पगारवाढ, प्रमोशन किंवा नवीन नोकरीची संधी मिळू शकते. व्यावसायिकांना त्यांच्या मेहनतीचं योग्य फळ मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल. जोडीदारासोबत एखाद्या रोमँटिक सहलीचं किंवा प्रवासाचं नियोजन होऊ शकतं.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement