मुंबई - दिवाळी आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळीमध्ये पणतीला विशेष महत्त्व असते. आपल्या घराजवळ डिझायनर पणत्या असाव्या, आपले घर आपण चांगल्या पणत्यांनी सजवावे, असे सर्वांना वाटते. त्याचमुळे जर तुम्ही मुंबईत राहत असाल आणि तुम्हाला कमी किमतीमध्ये वेगवेगळ्या डिझाईनच्या पणत्या आणि इलेक्ट्रॉनिक लॅम्प पाहिजे असेल, तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. मुंबईतील कुठल्या मार्केटमध्ये स्वस्त पणत्या मिळतात, हेच आपण आज जाणून घेणार आहोत.
advertisement
मुंबईतील भुलेश्वर मार्केटमध्ये वेगवेगळ्या डिझाईनचे मातीच्या पणत्या, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या डिझाईनच्या इलेक्ट्रिक पणत्या, तसेच दिवाळीसाठी लागणारे प्लास्टिकचे तोरण, स्टिकर रांगोळी अगदी स्वस्त दरात मिळतात. भुलेश्वर मार्केटमध्ये डिझायनर पणत्या अगदी 10 ते 25 रुपयांपासून डिझायनर पणत्या मिळतात. तसेच 6 डिझायनर पणत्यांचा सेट 50 रुपयांना मिळतो.
मोठ्या पणत्या, पंचमुखी पणत्या 20 ते 50 रुपयांना मिळतात. त्याचप्रमाणे मटक्याच्या आत मेण असणाऱ्या डिझाईनिंग पणत्याचा सेट 60 रुपयाला मिळतो. यामध्ये पण त्यांचे 6 पीस असतात. शुभ लाभची डिझाईन असणाऱ्या पणत्याही या मार्केटमध्ये 120 रुपयांना मिळतात. तर कमळची डिझाईन असणाऱ्या पणत्या या अगदी 50 ते 200 रुपयांपर्यंत मिळत आहेत.
त्याचप्रमाणे विविध आकार, रंग, डिझाईन असणाऱ्या पणत्याही याठिकाणी अगदी स्वत दरात मिळतात. आपण दिवाळीत घराबाहेर पणत्या लावतो, त्या विझू नयेत, यासाठी त्यांना झाकण्यासाठी लालटेनच्या प्रतिकृती असणारी डिझाईन सुद्धा या बाजारात मिळते. इलेक्ट्रॉनिक पणत्याही या बाजारात अगदी स्वस्तात उपलब्ध आहेत.
त्यानंतर रांगोळी स्टिकर, घराला लागणारे तोरणही इथे 20 ते 150 रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्हालाही जर या दिवाळीत डिझायनर पणत्या, रांगोळीचे स्टिकर, तोरण अगदी स्वस्त दरात हवे असेल तर तुम्ही याठिकाणी नक्की भेट देऊ शकतात.