Shubhangi Latkar Exclusive : चतुरस्त्र अभिनेत्री शुभांगी लाटकर यांनी सांगितली अभिनयाची व्याख्या, VIDEO

Last Updated:

actress shubhangi latkar exclusive interview - शुभांगी लाटकर यांनी बंध अनुबंध, गंगा की धीज, रक्तसंबंध, तू भेटशी नव्याने, लेक लाडकी या घरची, पिंजरा यासारख्या अनेक वेगळ्या धाटणीच्या मालिकांमध्ये काम केले आहे. पिंजरा या मालिकेत त्यांनी साकारलेली भूमिका तर प्रेक्षकांना खूप आवडली होती.

+
शुभांगी

शुभांगी लाटकर मुलाखत

प्रियांका जगताप, प्रतिनिधी
मुंबई - महाराष्ट्रातील अशा अनेक महिला कलाकार आहेत, ज्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीतही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. यापैकीच एक म्हणजे अभिनेत्री शुभांगी लाटकर. लोकल18 च्या टीमने त्यांची विशेष मुलाखत घेतली. जाणून घेऊयात, त्यांचा प्रेरणादायी प्रवास.
शुभांगी लाटकर या एक भारतीय अभिनेत्री आहेत, ज्या प्रामुख्याने हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये कार्यरत आहेत. या सोबतच त्या गेल्या अनेक वर्षांपासून मराठी नाट्यसृष्टीत कार्यरत होत्या. नाट्य स्पर्धा, एकांकिकेमधून त्यांनी उत्कृष्ट अभिनयाची पारितोषिक पटकावली. दिल्ली बेली (2011), आशिकी 2 (2013), सिंघम रिटर्न्स (2014) आणि जॉली एलएलबी 2 (2017) हे चित्रपट आणि नेटफ्लिक्सवरील वेब सीरिज द फेम गेममधील त्यांच्या भूमिकांसाठी त्या ओळखल्या जातात.
advertisement
शुभांगी लाटकर यांनी बंध अनुबंध, गंगा की धीज, रक्तसंबंध, तू भेटशी नव्याने, लेक लाडकी या घरची, पिंजरा यासारख्या अनेक वेगळ्या धाटणीच्या मालिकांमध्ये काम केले आहे. पिंजरा या मालिकेत त्यांनी साकारलेली भूमिका तर प्रेक्षकांना खूप आवडली होती. आता सध्या त्यांची अबीर गुलाल ही कलर्स मराठी वाहिनीवर मलिका सुरू आहे. तसेच त्या अनेक मराठी चित्रपटांमध्येही झळकल्या आहेत. त्यांचा घरत गणपती हा मराठी चित्रपट ही बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. मराठीसोबत हिंदी चित्रपटांमध्येदेखील त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
advertisement
फोर्स 2, आशिकी 2, जॉली एलएलबी 2 यांसारख्या चित्रपटामध्ये त्यांनी काम केले होते. हिंदीतील अनेक चित्रपटात त्या आईच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्यांच्या या भूमिकांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. लवकरच त्या आता क्रिमिनल जस्टिस सीझन-4, सिद्धार्थ जाधव यांच्यासोबत सुसाट नावाच्या या चित्रपटात दिसणार आहेत.
advertisement
कुटुंबीयांचा पाठिंबा म्हणून यश मिळालं -
advertisement
आजवर त्यांनी आपल्या अभिनयातून स्वतःला सिद्ध केले आहे. एक अभिनेत्री असण्यासोबतच त्यांनी त्यांचे कौटुंबिक जीवनही चांगल्या पद्धतीने सांभाळले आहे. प्रोफेशनल आणि पर्सनल कौटुंबिक गोष्टींवर त्यांची घट्ट पकड आहे. त्यांना परिवाराकडून खूप पाठिंबाही मिळतो, म्हणून आजपर्यंत त्या अभिनय क्षेत्रामध्ये यश प्राप्त करत आल्या आहेत, असे त्यांनी लोकल18 शी बोलताना सांगितले.
advertisement
आजवर त्यानी अनेक हिंदी, मराठी चित्रपट तसे नाटक मालिका वेब सीरिज आणि सध्या म्युझिक अल्बमध्ये काम करत असताना एक अभिनेत्री म्हणून अभिनय हा कसा व्यक्त कला जातो याचीही उत्तमरित्या मांडणी केली.
रंगमंचावर नाटक सादर करत असताना अभिनयाची भाषा व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते, जसे की नाटकामध्ये आपला आवाज, आपला चेहऱ्यावरील हावभाव हे शेवटच्या प्रेक्षकांपर्यंत कसे पोहचेल यासाठी खूप ठळक अभिनय व्यक्त करावा लागतो. पण हेच ऑन स्क्रिन कॅमेऱ्यासमोर चित्रीकरण करत असताना सौम्य अभिनय करावा लागतो. तसेच हलके चेहऱ्यावरील हावभाव, आवाजामधेही सौम्यपणा ठेवावा लागतो. एकंतरीतच त्यांच्या भाषेत अभिनय म्हणजे आपल्या हृदयातून केलेला अभिनय हा प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत थेट पोहचणे हाच होय, असे त्या म्हणाल्या.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Shubhangi Latkar Exclusive : चतुरस्त्र अभिनेत्री शुभांगी लाटकर यांनी सांगितली अभिनयाची व्याख्या, VIDEO
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement