TRENDING:

वय झालं तरी कधीही आजारी पडले नाहीत देवी प्रसाद, 100 वर्षांच्या 'फिट' आजोबांच्या दीर्घायुष्याचं गुपित काय?

Last Updated:

या आजोबांनी चक्क वयाचे शतक गाठले आहे. विशेष म्हणजे, वयाच्या 100 व्या वर्षीही ते दवाखान्याची पायरी चढलेले नाहीत. काय आहे त्यांच्या या सुपर-हेल्दी आयुष्यामागचं रहस्य?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आजच्या काळात पन्नाशी ओलांडली की शरीर वेगवेगळं दुखणं घेऊन येतं आणि आरोग्यासंबंधीत समस्या वाढतात. सांधेदुखीचा त्रास देखील वाढतो, पण मध्य प्रदेशातील या आजोबांबद्दल एक अशी गोष्ट समोर आली आहे, ज्याने सर्वांनाच आश्चर्यचकीत केलं आहे. या आजोबांनी चक्क वयाचे शतक गाठले आहे. विशेष म्हणजे, वयाच्या 100 व्या वर्षीही ते दवाखान्याची पायरी चढलेले नाहीत. काय आहे त्यांच्या या सुपर-हेल्दी आयुष्यामागचं रहस्य?
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

धावपळीचे आयुष्य, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि वाढतं प्रदूषण यामुळे आजची विशी-तिशीतील तरुण पिढी लवकर थकते. थोडं चाललं तरी धाप लागते किंवा पाठदुखी सुरू होते. अशा वातावरणात मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील एका व्यक्तीची गोष्ट सर्वांना चकित करणारी आहे. आम्ही बोलत आहोत देवी प्रसाद बिदुआ यांच्याबद्दल, जे 2026 मध्ये आपल्या आयुष्याचे शतक पूर्ण करत आहेत. पण, 100 वर्षांचे झाले म्हणजे ते थकले आहेत असं अजिबात समजू नका; कारण त्यांची चपळाई आजही एखाद्या 20 वर्षांच्या तरुणाला आव्हान देऊ शकते.

advertisement

आजच्या काळात जेव्हा पन्नाशी पार केलेले लोक थोड्या कामासाठीही इतरांवर अवलंबून असतात, तेव्हा देवी प्रसाद आजोबा आपला पूर्ण दिनक्रम स्वतः सांभाळतात. ते दररोज आपल्या घरून शेतापर्यंत पायी चालत जातात. आपले कपडे स्वतः धुतात आणि स्वतःची अंथरुण-पांघरूणं स्वतः लावतात. घरातील पायऱ्या चढणे-उतरणे त्यांना अजिबात जड जात नाही. दररोज सकाळी अंघोळ करून भगवान शिवाला जल अर्पण करण्याची त्यांची श्रद्धा आजही कायम आहे.

advertisement

डोळे सतेज, कानाने स्पष्ट ऐकू येतं

वाढत्या वयानुसार दृष्टी कमी होणे किंवा ऐकायला कमी येणे हे नैसर्गिक मानले जाते. पण देवी प्रसाद बिदुआ यांच्या बाबतीत निसर्गाचे नियम वेगळे आहेत. ते आजही डोळ्यांनी स्पष्ट पाहू शकतात आणि समोरच्याचे प्रत्येक शब्द स्पष्ट ऐकू शकतात. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, आजपर्यंत त्यांना कोणताही गंभीर आजार झालेला नाही.

advertisement

आजोबांच्या या फिट शरीराचे मुख्य कारण म्हणजे त्यांची 'डाएट'. वयाच्या 100 व्या वर्षीही ते एका वेळी 6 चपात्या (पोळ्या) आणि अर्धा लिटर दूध आरामात फस्त करतात. त्यांची ही खुराक पाहून आजचे जिममध्ये जाणारे तरुणही थक्क होतील.

त्यांच्या आहारात नेमके काय असते?

लहानपणापासून त्यांनी शुद्ध दूध आणि तुपाचे सेवन केले आहे. ते आजही 'कटिया' गव्हाचा दलिया खातात. पारंपारिक आणि पौष्टिक पदार्थांवर त्यांचा जास्त भर आहे, ज्यात महुआचे लाडू, महुआचा मुरब्बा, ज्वारी आणि कुदई यांसारख्या भरड धान्यांचा समावेश असतो.

advertisement

दात कमी झाल्यामुळे काही कडक पदार्थ खाता येत नसले, तरी महुआची डुबरी ते आजही आवडीने खातात.

शेतात चारा कापतात

ज्या वयात लोक अंथरुणाला खिळून राहतात, त्या वयात देवी प्रसाद आजही शेतात जाऊन आपल्या पशुंसाठी हाताने चारा कापतात (कतरणे). कामाप्रती असलेली त्यांची ही जिद्द आणि उत्साह पाहून अख्खा गाव त्यांची प्रशंसा करत आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कापूस आणि तुरीच्या दरात उलथापालथ, सोयाबीनची कशी राहीली स्थिती? इथं चेक करा
सर्व पहा

थोडक्यात सांगायचे तर देवी प्रसाद बिदुआ यांचे आयुष्य हे सिद्ध करते की, जर आपण निसर्गाच्या जवळ राहिलो आणि शुद्ध, सात्विक आहाराची कास धरली, तर वय हे केवळ एक 'नंबर' उरते. आजच्या 'फास्ट फूड'च्या जमान्यात आजोबांची ही जीवनशैली सर्वांसाठी एक मोठा धडा आहे.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
वय झालं तरी कधीही आजारी पडले नाहीत देवी प्रसाद, 100 वर्षांच्या 'फिट' आजोबांच्या दीर्घायुष्याचं गुपित काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल