TRENDING:

Retinopathy : मधुमेहापासून दूर राहा, असेल तर नियंत्रित ठेवा, रक्तातल्या वाढलेल्या साखरेनं डोळ्यांचं होतं मोठं नुकसान

Last Updated:

मधुमेहामुळे ऑप्टिक नर्व्हवर परिणाम होतो, ज्यामुळे डोळ्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं. याचा परिणाम किती धोकादायक असू शकतो समजून घेऊया. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मधुमेह हा विकार कोणत्याही एका अवयवाला नाही तर शरीरावर परिणाम करतो. मधुमेह नियंत्रित नसेल तर मधुमेहाचा डोळ्यांवर परिणाम होतो.
News18
News18
advertisement

मधुमेहामुळे ऑप्टिक नर्व्हवर परिणाम होतो, ज्यामुळे डोळ्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं. याचा परिणाम किती धोकादायक असू शकतो समजून घेऊया.

रक्तवाहिन्यांवर परिणाम - रक्तातील साखरेची पातळी बराच काळ जास्त राहते तेव्हा शरीरातील लहान रक्तवाहिन्यांचं नुकसान व्हायला सुरुवात होते. यामधे आपल्या डोळ्यांच्या रेटिनातील लहान रक्तवाहिन्यांचा समावेश होतो. साखरेची वाढलेली पातळी या रक्तवाहिन्यांना कमकुवत करू शकते आणि नुकसान पोहोचवू शकते, या स्थितीला डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणतात.

advertisement

Summer Acidity : उन्हाळ्यात सुरु होते पोटात गडबड, सोप्या उपायांनी थांबवा पोटदुखी

अनियंत्रित शिरांची निर्मिती - मधुमेह वाढत जातो तसतसे डोळे या नुकसानाची भरपाई करण्याचा प्रयत्न करतात. या प्रक्रियेत डोळ्यात नवीन आणि अनियंत्रित रक्तवाहिन्या तयार होतात. या नवीन रक्तवाहिन्या खूप नाजूक असतात आणि द्रव बाहेर पडतो त्या ठिकाणी तयार होतात. यामुळे द्रव बाहेर पडण्यापासून रोखलं जातं आणि डोळ्यातील दाब वाढायला सुरुवात होते.

advertisement

डोळ्यांचा दाब वाढणं आणि काचबिंदू - डोळ्यात अ‍ॅक्विस ह्युमर नावाचा द्रव साचल्यानं डोळ्यातील दाब वाढतो. हा वाढलेला दाब काचबिंदूचं म्हणजे ग्लुकोमा होण्याचं मुख्य कारण आहे, ज्याला निओव्हस्कुलर काचबिंदू / ग्लुकोमा असंही म्हणतात. हा वाढलेला दाब डोळ्यांतून मेंदूला सिग्नल प्रसारित करणाऱ्या ऑप्टिक नर्व्हला थेट नुकसान पोहोचवतो.

Body Pain : सकाळी उठल्यावर अंगदुखी जाणवते ? व्यायाम न करताही अंग का दुखतं ?

advertisement

दृष्टी कमी होण्याचा धोका - यावर वेळेवर उपचार केले नाही तर ऑप्टिक नर्व्हला होणारं हे नुकसान गंभीर असू शकतं आणि यामुळे दृष्टी कमी होऊ शकते. मधुमेहावर योग्य नियंत्रण नसलेल्यांना काचबिंदू होण्याचा धोका जास्त असतो.

डोळ्यांचं नुकसान रोखण्यासाठी टिप्स -

डोळ्यांच्या रक्षणासाठी, तीन गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे:

रक्तातील साखरेची पातळी नेहमीच स्थिर आणि नियंत्रित ठेवा.

advertisement

डोळ्यांची तपासणी नियमित करा.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या शेतात लावलं 'पैशाचं पीक', 3 वर्षे नो टेन्शन, फक्त तोडायचं अन् विकायचं, कमाई किती? Video
सर्व पहा

मधुमेहाच्या डोळ्यांच्या आजाराची लक्षणं दिसल्यास ताबडतोब उपचार सुरू करा.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Retinopathy : मधुमेहापासून दूर राहा, असेल तर नियंत्रित ठेवा, रक्तातल्या वाढलेल्या साखरेनं डोळ्यांचं होतं मोठं नुकसान
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल